Budha Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. बुध ग्रह बुद्धिमत्तेचा कारक आहे. व्यवसाय आणि करिअर क्षेत्रात विशेष यश मिळवून देण्यासाठी बुधाची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे बुध ग्रहाला ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजकुमार, अशी पदवी देण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे बुध ग्रह जेव्हा कधी एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो, तेव्हा त्या संक्रमणाचा सर्व राशींच्या लोकांवर थेट परिणाम होत असतो. अशातच बुध ग्रह २९ ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच या राशींच्या लोकांच्या संपत्तीतही वाढ होऊ शकते. चला तर मग बुधाच्या राशिबदलाचा कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊ…

बुधाच्या राशी संक्रमणाने ‘या’ तीन राशी होणार मालामाल (Budh Gochar 2024 Scorpio)

वृश्चिक (Scorpio Zodiac)

बुधाचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळेल. नोकरी वा व्यवसायातील प्रगतीबरोबर तुम्हाला समाजात एक वेगळी ओळख मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. तुम्हाला अनेक महत्त्वाच्या निर्णयांत सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल. यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होईल. वरिष्ठांबरोबरचे तुमचे संबंध अधिक चांगले होतील.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

वृषभ (Taurus Zodiac)

बुधाचे वृश्चिक राशीतील संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठीही शुभ ठरू शकते. या काळात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल. या काळात तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. तसेच या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात वेगळे बदल पाहायला मिळतील. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. कोणतेही काम करीत असाल, तर त्यात यश मिळेल. त्याच वेळी मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमीही मिळू शकते.

हेही वाचा – Ganesh Chaturthi 2025 : पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला साजरी होईल? जाणून घ्या नेमकी तारीख आणि महत्त्व

मकर (Makar Zodiac)

बुधाचे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि आर्थिक स्थितीही मजबूत होईल. त्यामुळे तुमच्या आनंदात वाढ होईल; तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे.