Budha udya 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाच्या राशी परिवर्तनाला आणि नक्षत्र परिवर्तनाला अत्यंत खास मानले जाते. प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर हे परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन आणि अस्त, उदय या अवस्थाही खूप खास मानल्या जातात. बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याच्या या अवस्थांचा १२ पैकी काही राशींवर विविध प्रभाव पाहायला मिळतो. दरम्यान, येत्या २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजून ४१ मिनिटांनी बुधाचा कुंभ राशीमध्ये उदय होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर विशेष प्रकारे पाहायला मिळेल.

‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार

मिथुन

मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी बुधाचा उदय अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आईचे आरोग्यही उत्तम असेल. या काळात प्रमोशन होईल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल. राजकारणाशी संबंधीत लोकांना यश मिळेल.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही बुधाचा उदय अनेक चांगले परिणाम घेऊन येणारा ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. आयुष्यात नवी संधी मिळेल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवन सुखाचे क्षण येतील.

मेष

मेष राशींच्या व्यक्तींसाठी बुधाचा उदय खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. या काळात आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. भाऊ-बहिण, मामा यांची मदत मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader