Budh Margi 2025 : चैत्र नवरात्रीच्या महाअष्टमीला माता महागौरीची पूजा केली जाते. महाअष्टमीचा दिवस खूप खास मानला जातो कारण या दिवशी अनेक लोक आपल्या घर कन्येचे पूजन करते आणि नवरात्रीचे पारण करते पण चैत्र नवरात्रीच्या महाअष्टमी नंतर दुसऱ्या दिवशी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. ६ एप्रिल सायंकाळी ४ वाजून ४ मिनिटांनी मीन राशीमध्ये प्रवेश करतील. बुध देव या राशीमध्ये ७ मे पर्यंत विराजमान असतील. जाणून घेऊ या बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींना विशेष फायदा होणार आहे.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांना धन प्राप्ती होऊ शकते. पैशांची बचत करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेन आणि जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात आर्थिक स्थिती उत्तम राहीन. व्यवसायामुळे विदेशात प्रवास करण्याचे योग जुळून येतील. व्यावसायिकांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल.
मिथुन राशी
कार्यक्षेत्रात या लोकांना नवीन संधी मिळतील. विरोधकांवर विजय प्राप्त होईल. समाजात मान प्रतिष्ठा वाढणार. करिअरमध्ये यशाचे सकारात्मक बदल दिसून येईल. व्यवसायात जबरदस्त नफा प्राप्त होऊ शकतो. प्रॉपर्टी किंवा जमीन खरेदी करू शकता. या दरम्यान या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. जमीनीशी संबंधित कार्यांमध्ये जबरदस्त नफा मिळू शकतो. व्यवसायात प्रगती होऊ शकते.
सिंह राशी
बुध ग्रहाच्या गोचरमुळे सिंह राशीच्या लोकांच्या सर्व आर्थिक इच्छा पूर्ण होणार. वैवाहिक जीवनातील समस्या समाप्त होतील. पगारात वाढ होऊ शकते आणि नवीन लोकांचा संपर्क वाढू शकतो ज्यामुळे लोकांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात या लोकांची आर्थिक स्थिती आणखी उत्तम होणार. यांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना नवी नोकरीची संधी मिळू शकते. घर कुटुंबात आनंदाचे वातावरण राहीन. पितृ संपत्तीचा लाभ मिळू शकतो. कोणत्याही मोठ्या अडचणींपासून सुटका होईल.
तुला राशी
तुळ राशीच्या लोकांना नशीबाची चांगली साथ मिळेल. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. धनसंबंधित प्रकरणार नशीबाची साथ मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना जबरदस्त नफा मिळू शकतो. धन संपत्तीच्या स्थितीमध्ये सकारात्मक सुधारणा दिसून येईल. प्रवासाच्या योगमुळे धन लाभ होईल. वैवाहिक जीवनात प्रेम संबंध आणखी दृढ होईल. नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांना नवीन रोजगाराची संधी मिळू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना चांगले ऑफर मिळू शकतात. यशाचे स्पष्ट संकेत मिळू शकतात. वैवाहिक आयुष्यात सुख शांती दिसून येईल. या दरम्यान या लोकांना शुभ वार्ता मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती आणखी उत्तम होईल. नोकरीमध्ये प्रमोशनची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)