Budh Gochar 2023: ग्रहांचा राजा बुध हा यंदाच्या वर्षातील सर्वात शक्तिशाली ग्रह असल्याचे वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी सांगितले आहे. बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशुद्ध विचार, संवाद कौशल्य, व्यवसाय ज्ञान या सर्व वैशिष्ट्यांचा कारक मानला जातो. आज म्हणजेच १५ मेला रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी बुध ग्रह हा मेष राशीत प्रवेशासाठी मार्गी होणार आहे. यामुळे ५ राशींच्या भाग्यात बुध ग्रह अत्यंत लाभदायक स्थानी येणार आहे. याचा प्रभाव १६ मे पासून दिसू शकतो. बुध मार्गी झाल्याने या राशींची सर्व प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत होईल असे अंदाज आहेत. या राशी कोणत्या व त्यांना आर्थिक लाभासाठी कोणते मार्ग खुले होणार आहेत हे पाहूया…
आजपासून ‘या’ ५ राशी होतील लखपती?
मिथुन रास (Gemini Zodiac)
मिथुन राशीच्या गोचर कुंडलीत बुध ग्रह ११ व्या स्थानी मार्गी होणार आहेत. हे स्थान करिअरला पूरक ठरते त्यामुळे या राशीच्या नोकरदार मंडळींना प्रचंड मोठी झेप घेता येऊ शकते. आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संवाद साधण्याची संधी मिळेल यावेळी तुम्हाला आपल्या हुशारीने समोरच्यांना आकर्षित करून . याचा बोनस व स्लरीवर सुद्धा दिसून येऊ शकतो. यामुळेच येत्या काळात तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय तुमचे अडकलेले पैसे सुद्धा परत मिळू शकतात.
सिंह रास (Leo Zodiac)
मेष राशीत बुध ग्रह मार्गी झाल्याने सिंह राशीच्या गोचर कुंडलीत सुद्धा लाभस्थानी प्रभाव दिसून येणार आहे. बुध ग्रह आपल्या राशीत ९ व्या स्थानी येणार आहे, यामुळे तुम्हाला नवनवीन गुंतवणुकीच्या संधी चालून येऊ शकतात. धार्मिक कारणांनी एखादा प्रवास करावा लागू शकतो. परदेश प्रवासाचे योग्य आहेत. तुम्हाला बचतीच्या स्वरूपात आर्थिक बाजू मजबूत झाल्याचे अनुभवता येऊ शकते.
कर्क रास (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या मंडळींच्या गोचर कुंडलीत बुध ग्रह १० व्या स्थानी मार्गी होणार आहे. याचा प्रभा तुम्हाला नोकरीच्या संधीमध्ये दिसून येऊ शकतो. तुम्हाला येत्या महिन्याभरात परदेशात नोकरीची संधी मिळू शकते. करिअरमध्ये पुढे जाताना तुम्हाला कौटुंबिक सुख कमी झाल्याचे अनुभवता येऊ शकते मात्र यासाठी तुम्हाला वेळेचे नीट नियोजन करणे गरजेचे आहे.
कन्या रास (Virgo Zodiac)
बुध ग्रह तुमच्या गोचर कुंडलीत ८ व्या स्थानी मार्गी होणार आहेत, यामुळे तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये सुद्धा वडिलांच्या स्थानाचा प्रचंड फायदा होऊ शकतो. तुमचे प्रलंबित काम मार्गी लागल्याने यातून मिळणारे पैसे तुम्हाला र्थिक पाठबळ देऊन जाऊ शकतात.
हे ही वाचा<< कोट्यधीशांचे नशीब घेऊन जन्म घेतात ‘या’ व्यक्ती? तुमच्या वाढदिवसाची तारीख व धनलाभाचा मार्ग काय?
धनु रास (Sagittarius Zodiac)
धनु राशीसाठी बुध देव मार्गी होणे हे फलदायक असू शकते. या काळात आपल्याला स्वप्नपूर्तीचा अनुभव घेता येऊ शकतो. आपल्याला एखाद्या नव्या उपक्रमाचा भाग होता येऊ शकतो. बुद्ध आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत पाचव्या स्थानी येत असल्याने तुम्हाला बुद्धीचा प्रचंड फायदा होऊ शकतो. कामाच्या बाबत विश्वास अगदी विचारपूर्वक ठेवा. वाणीवर नियंत्रण असू द्या. आपल्या दुखावले जाणार नाही याची विशेष काळजी घ्या.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)