Mercury Gochar In Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. यासोबतच ग्रहाच्या हालचालीत होणारा बदल देखील काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ आहे. फेब्रुवारीमध्ये बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे . ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण अशा तीन राशी आहेत, ज्यांच्यासाठी बुधाचे संक्रमण शुभ सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी..
मेष राशी
बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या राशीतून अकराव्या घरात बुधाचे संक्रमण होणार आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. म्हणूनच यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता दिसतेय. यासोबतच या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. बुध ग्रहाला व्यवसायाचा दाता म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तसेच ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे ते यावेळी करू शकतात.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण शुभ ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीच्या दहाव्या भावात भ्रमण करेल. त्यामुळे बेरोजगारांना यावेळी नवीन नोकरीची संधी मिळू शकते. यासोबतच व्यवसाय करणाऱ्या लोकांना यावेळी चांगला फायदा होऊ शकतो. दुसरीकडे, जर तुम्ही मीडिया, फॅशन डिझायनिंग, फिल्म लाइन किंवा लक्झरी वस्तूंचा व्यवसाय करत असाल तर हा कालावधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
( हे ही वाचा: १२ महिन्यांनी ‘धन राजयोग’ बनल्याने ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? गुरुदेव वर्षभर देणार प्रचंड धनलाभाची संधी)
मकर राशी
बुधाचा राशी बदल तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. कारण बुधाचे हे संक्रमण तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात होणार आहे. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर याकाळात तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. या काळात काही कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. दुसरीकडे, जर तुम्ही कोणतेही कर्ज घेतले असेल तर तुम्ही ते यावेळी परत करू शकता.