Mesh To Meen Horoscope in Marathi : ७ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी सोमवारी रात्री ८ वाजून ०१ मिनिटांपर्यंत चालेल. धृती योग संध्याकाळी ६ वाजून १९ मिनिटांपर्यंत राहील. तसेच आश्लेषा नक्षत्र मंगळवारी सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी बुध मीन राशीत मार्गी होत आहे. तर बुध ग्रहाचे मीन राशीत परिवर्तन होताच कोणत्या राशीवर कसा परिमाण होणार हे आपण जाणून घेऊया…

७ एप्रिल पंचांग व राशिभविष्य:

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)

सामाजिक सन्मान वाढेल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. खाण्यापिण्याची चंगळ राहील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. व्यावसायिक नियम काटेकोरपणे पाळावेत.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)

धार्मिक गोष्टींत मन रमवा. वरिष्ठांना नाराज करू नका. लहानांच्या आनंदात सहभागी व्हाल. आनंदी दृष्टिकोनाने वागाल. अभ्यासूपणे नवीन गोष्टींत रस घ्याल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)

काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील घरात मोठ्या लोकांची ऊठबस राहील. वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. मनातील चुकीच्या गोष्टी काढून टाका.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)

मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. इतरांना तुमच्या भेटीने आनंद वाटेल. उत्तम आर्थिक प्राप्ती येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. स्त्रियांच्या मदतीचा लाभ होईल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)

व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता राहील. सहकार्‍यांच्या कौतुकास पात्र व्हाल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. तिखट व तामसी पदार्थ खाण्याचे टाळा. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)

मैदानी खेळ खेळाल. शैक्षणिक कामाला गती येईल. नवीन अनुभव मिळतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागाला आवर घाला.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)

अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराचे कौतुक कराल. भागीदारीत नवीन धोरण अजमावाल. घरगुती कामात वेळ जाईल. अती घाई उपयोगाची नाही.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)

स्त्री सौख्यात अधिक रमाल. जवळचा प्रवास कराल. एकमेकांना समजून घ्यावे. प्रकृतीत सुधारणा दिसून येईल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)

हाताखालील लोकांकडून कामे करून घेता येतील. कौटुंबिक प्रश्न आधी सोडवाल. जवळचे मित्रमंडळी गोळा कराल. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद वाढवू नका. व्यसनांच्या आहारी जाऊ नका.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)

काहीसे हेकेखोरपणे वागाल. सरकारी कामात यश येईल. रखडलेल्या कामाला गती येईल. उगाच चीड-चीड करू नका. संयमी धोरण ठेवावे.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)

कामाच्या ठिकाणी तुमचा वरचष्मा राहील. अधिकाराने कामे हातावेगळी कराल. घरगुती वस्तूंची खरेदी करता येईल. मनमोकळ्या गप्पा माराल. नवीन मित्र जोडावेत.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)

नातलगांशी सलोखा वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची आवड-निवड दर्शवाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर