ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध ग्रह संपत्ती, व्यवसाय, वाणी, बुद्धिमत्ता, संवादाचा कारक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाचे संक्रमण अथवा उदय होतो त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. दरम्यान ग्रहांचा राजकुमार मानला जाणाऱ्या बुध ग्रह १६ सप्टेंबरपासून सिंह राशीत मार्गी झाले आहेत. तर आधीपासूनच सुर्यदेव सिंह राशीत असल्याने बुधादित्य राजयोग बनला आहे. यांच्या संक्रमणामुळे अनेक राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम मिळू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२० दिवस ‘या’ राशींचे लोकं मालामाल होणार?

मेष राशी

बुधदेव मार्गी झाल्याने मेष राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक लाभ मिळू शकतात. व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळू शकते. पैशाची आवक वाढण्याची दाट शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात प्रगती होऊ शकते, वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो. या काळात कुटुंबासोबत प्रवास घडू शकतात.

(हे ही वाचा : शनिदेव दोन शुभ राजयोग घडवून डिसेंबरपर्यंत ‘या’ चार राशींना देणार अपार धन? माता लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकता श्रीमंत )

वृषभ राशी

बुधदेवाचे मार्गी होणे वृषभ राशीतील मंडळींसाठी फलदायी ठरु शकते. या राशीच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते. समाजात मान-सन्मान, पद मिळू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. अचानक धनलाभ होऊ शकतो.

मिथुन राशी

मिथुन या राशीच्या लोकांना या काळात भौतिक सुखाचा आनंद मिळू शकतो. गाडी, मालमत्ता खरेदीचे योग आहेत. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. नातेसंबंधातील वाद मिटू शकतो. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ उत्तम ठरु शकतो. लव्ह लाइफमध्येही सकारात्मक परिणाम दिसू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budh gochar mercury planet margi in singh these three zodic signs bank balance to raise money marathi astrology pdb
Show comments