वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला व्यापार, बुद्धिमत्ता, अर्थव्यवस्था, वाणी आणि संवादाचे कारक मानलं जातं. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुधाच्या हालचालीत बदल होतो. तेव्हा वरील क्षेत्रांवर विशेष परिणाम होतो. विशेषतः बुध ग्रह १ महिन्यानंतर गोचर करतात, परंतु ते नोव्हेंबर महिन्यात बुध दोन वेळा गोचर करणार आहेत. ज्यामध्ये ते ६ नोव्हेंबरला वृश्चिक राशीत तर २७ नोव्हेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. पण ३ राशी असा आहेत ज्यांचे नशीब या काळात चमकू शकते. तसेच त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ.
मेष रास (Aries Zodiac)
बुध ग्रहाचे दोनदा गोचर होणे मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचा रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. पैशाशी संबंधित जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही प्रवास करू शकता. संशोधन क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांना या काळात चांगला फायदा होऊ शकतो. तर स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हे गोचर फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
कन्या रास (Kanya Zodiac)
बुध ग्रहाचे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतं. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करु शकता. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुम्हाला भावंडांचे सहकार्य मिळू शकते. या गोचरमुळे वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते. नोकरदारांचे प्रमोशन होऊन चांगल्या करिअरची संधी उपलब्ध होऊ शकते.
मकर रास (Makar Zodiac)
बुध ग्रहाचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी शुभ सिद्ध ठरु शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तसेच तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदलही होऊ शकतात. तुम्हाला काही योजनांमध्ये यश मिळू शकते. तसेच, तुम्ही या काळात बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)