Budh Gochar Kendra Trikon Rajyog Next 13 Days: ग्रहांचा राजकुमार अशी ओळख असलेला बुध ग्रह सध्या मेष राशीत आहे. २६ मार्चला रात्री ९ वाजून २ मिनिटांनी बुधाने गोचर करून मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला होता. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पुढील १३ दिवस म्हणजेच ९ एप्रिलपर्यंतच्या कालावधीत बुधाचे मेष राशीतच वास्तव्य असेल. बुध सध्या मेष राशीच्या लग्न भावी व मकर राशीच्या चतुर्थ म्हणजेच केंद्र स्थानी उपस्थित आहेत. या स्थितीमुळे बुध केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होत आहे. जोपर्यंत बुध ग्रह मेष राशीत असेल म्हणजेच ९ एप्रिलपर्यंत हा केंद्र त्रिकोण योग कायम असणार आहे. जेव्हा असा राजयोग निर्माण होतो तेव्हा प्रभावित राशींना दुप्पटीने यश व धन लाभ होत असतो असे म्हणतात. यानुसार २६ मार्चपासून पुढील १३ दिवस प्रभावित राशींना सुगीचे दिवस अनुभवता येणार आहे. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय हे पाहूया..
केंद्र त्रिकोण राजयोगाने ‘या’ तीन राशी होतील मालामाल, लक्ष्मी कशी येईल दारी?
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
ज्योतिषशास्त्रानुसार केंद्र त्रिकोण राजयोग हा कर्क राशीच्या कुंडलीत कर्म भावी तयार होत आहे. त्यामुळे आपल्याला या कालावधीत विशेष लाभ होण्याची चिन्हे आहेत. कर्क राशीच्या मंडळींना नोकरी व व्यवसायात अपेक्षित मात्र अचानक वेगाने लाभ प्राप्त होऊ शकतात. जीवनात नवीन संधी निर्माण होतील. कुटुंबासह काही छान क्षण अनुभवू शकता. नोकरदार मंडळींना या कालावधीत नोकरी बदलण्यासाठी सुद्धा उत्तम योग आहे. तुम्हाला हवा तसा पगार किंवा पद प्राप्त करण्यासाठी एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. नोकरीच्या किंबहुना कर्माच्या रूपातच तुमच्याकडे लक्ष्मी मातेचे आगमन होणार आहे.
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
केंद्र त्रिकोण राजयोगाचा प्रभाव आपल्या राशीत बाराव्या स्थानी निराळीं होत आहे. आपल्याला पुढील काहीच दिवसात एखाद्या दूरच्या प्रवासाची संधी चालून येऊ शकते. परदेश प्रवासाचे सुद्धा संकेत कुंडलीत आहेत. धार्मिक मंगल कार्यात तुम्हाला सहभागी व्हावे लागू शकते. वाडवडिलांच्या संपत्तीची कामे मार्गी लागू शकतात. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ यशाची चाहूल घेऊन येणार आहे. जुनी स्वप्न पूर्ण करता येतील. तुम्हाला तुमच्या मुलांच्या रूपात लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. चांगल्या घडामोडींची पुढील १३ दिवस सुख अनुभवाल.
हे ही वाचा <<आज संकष्टी चतुर्थीला मेष ते मीनपैकी कुणाच्या कुंडलीत मोदक पेढ्यांचा गोडवा? बाप्पा वर देणार की दंड, वाचा
मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
मकर राशीसाठी बुधाचे गोचर व केंद्र त्रिकोण राजयोगाचा प्रभाव सर्वाधिक फायद्याचा असणार आहे. गोचरानंतर बुधाचा तुमच्या कुंडलीतील प्रभाव चतुर्थ स्थानी असणार आहे. आपल्याला भौतिक सुख अनुभवता येईल. वाहन म्हणा किंवा प्रॉपर्टी खरेदीसाठी उत्तम व फायद्याची डील चालून येऊ शकते. गुंतवणुकीच्या रूपात पैशांची वाढ करावी. पूर्वजांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताचे महत्त्व वाढेल. जुन्या कामाच्या किंवा जुन्या गुंतवणुकीच्या रूपात तुमचेच पैसे तुमच्या हाती खेळते राहतील.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)