Budh gochar twice in January : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, व्यवसायाच्या दाता बुध जानेवारी २०२५ मध्ये दोन वेळा गोचर करणार आहे. बुध ग्रहाला तर्क शक्ती, व्यवसाय आणि बुद्धीचा कारक मानला जातो. जेव्हा बुध ग्रहाच्या चालीमध्ये परिवर्तन होते, तेव्हा काही क्षेत्रावर विशेष परिणाम होतो.
जानेवारी महिन्यात बुध धनु आणि मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. बुध गुरू आणि शनि राशीच्यामध्ये प्रवेश करत असल्याने काही राशींना चांगले दिवस येऊ शकतात. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या बुध गोचरमुळे कोणत्या राशींना लाभ मिळू शकतो.
मेष राशी (Aries Zodiac)
मेष राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह दोनदा गोचर करणार आहे. बुध ग्रहाचे दोनदा गोचर या राशीच्या लोकांसाठी लाभदायक होऊ शकते. कारण बुध ग्रह या राशीच्या नवव्या आणि दहाव्या स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना नशीबाची साथ मिळू शकते. तसेच नोकरी शोधणाऱ्या लोकांना नोकरी मिळू शकते. या वेळी धनसंपत्तीची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. या दरम्यान या लोकांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. या दरम्यान हे लोक खूप धार्मिक दिसून येईल. या लोकांना धार्मिक कार्यामध्ये आवड निर्माण होईल. देश विदेशातील हे लोक यात्रा करू शकतात.
मकर राशी (Makar Zodiac)
मकर राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे दोनदा गोचर लाभदायक ठरू शकते. कारण बुध ग्रह मकर राशीच्या लग्न भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. तसेच या दरम्यान विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहीन. या लोकांचे लोक कुटुंब आणि जोडीदाराबरोबर संबंध आणखी मजबूत होईल. या दरम्यान या लोकांना प्रवास करावा लागू शकतो. या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. तसेच या दरम्यान या लोकांचा मान- सम्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तसेच ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होतील.
तुळ राशी (Tula Zodiac)
तुळ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे राशी परिवर्तन शुभ ठरू शकते. कारण बुध ग्रह या राशीच्या चतुर्थ भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांच्या सुख सुविधांमध्ये लाभ दिसून येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो. वरिष्ठांचे सहकार्य लाभेन. त्यांच्याबरोबर चांगले संबंध निर्माण होतील. या दरम्यान हे लोक वाहन, प्रॉपर्टी, जमीन संपत्ती खरेदी करू शकतात ज्यामुळे यांना चांगला लाभ मिळू शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)