ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो आणि त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. बुद्धी आणि व्यवसायाचा कारक असलेला बुध ग्रह २५ एप्रिलला शुक्राचं अधिपत्य असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा बुध ग्रहाचे संक्रमण होते तेव्हा त्याचा व्यापार, शेअर बाजार, अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे बुधाचे संक्रमणही सर्व राशींवर परिणाम करेल. पण तीन राशी आहेत, त्यांना विशेष फायदा होईल
कर्क: बुध ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या अकराव्या भावात प्रवेश करेल. या स्थानाला उत्पन्नाचे स्थान म्हणतात. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते. व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. तसेच बुध तुमच्या चौथ्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे वाहन आणि घराचे सुखही मिळू शकते. आईशी संबंध चांगले राहतील. तसेच बुध ग्रह हा तुमच्या पराक्रमाचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुमची ताकद वाढेल. यासोबत गुप्त शत्रूंचा नाश होईल.
सिंह: तुमच्या राशीत बुध दशम भावात प्रवेश करेल. हे स्थान करिअर आणि नोकरीचे स्थान आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. यासोबतच नवीन व्यावसायिक संबंधही निर्माण होऊ शकतात. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. तुमची कार्यशैली सुधारेल, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होईल. यासोबतच कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. दुसरीकडे, बुध ग्रह तुमच्या पैशाचा आणि वाणीचा स्वामी आहे, त्यामुळे यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. तसेच अडकलेले पैसे मिळू शकतात.
Trigrahi Yog: मेष राशीत त्रिग्रही योग, तीन राशींसाठी शुभ काळ
मेष: बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण बुध तुमच्या दुसऱ्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला धन आणि वाणीचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, व्यवसायात नवीन करार निश्चित होऊ शकतो. जे वकील, मार्केटिंग आणि शिक्षक यांसारख्या भाषण क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ चांगला जाणार आहे. तसेच बुध तुमच्या तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुमची ताकद वाढेल. यासोबत गुप्त शत्रूंचा नाश होईल. यावेळी भावंडांचे सहकार्य मिळू शकते.