बुध ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाला शुभ ग्रह मानले जाते. कुंडलीत इतर ग्रह बुध ज्या ग्रहांसोबत असेल त्या योग्य फळ देतो. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, तर्क, संवाद, गणित, वाणी इत्यादींचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने आज ११ वाजून ५० मिनिटांनी वाजता मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला आहे. बुधाचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करणार आहे.
कन्या ही बुधाची उच्च राशी आहे, तर मीन रास हे त्याचे निम्न रास मानली जाते. बुधाचा संक्रमण कालावधी २३ दिवस आहे. म्हणजेच बुध ग्रह एका राशीत सुमारे २३ दिवस राहतो आणि नंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या राशीत बुध ग्रह २५ एप्रिल २०२२ पर्यंत राहणार आहे. सर्व १२ राशींमध्ये मेष प्रथम क्रमांकावर आहे. मंगळाचे मेष हे अग्नि तत्वाचे चिन्ह आहे. तर स्वामी मंगळ हा अग्निमय ग्रह मानला जातो. ज्याचा संबंध युद्ध, पराक्रम, रक्त, तंत्र इत्यादींशी आहे. विशेष म्हणजे बुधाचे मंगळाशी वैर आहे. म्हणजेच बुधाचे संक्रमण शत्रूच्या राशीत होत आहे.
Solar Eclipse: ३० एप्रिलला या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण, तीन राशींना होणार फायदा
राहु-बुध योग
ज्योतिष शास्त्रानुसार राहू आणि बुध यांच्या संयोगाने एक विशेष प्रकारचा योग तयार होतो, याला जडत्व योग म्हणतात. ज्योतिषशास्त्रात हा योग शुभ मानला जात नाही. परंतु काही प्रकरणांमध्ये हा योग शुभ परिणाम देखील देतो. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत हा योग तयार झाल्यास व्यक्तीची बुद्धी कुंठित होते, असे सांगितले जाते. १२एप्रिल रोजी राहूने राशी बदलताच, मेष राशीमध्ये बुध-राहू संयोग तयार होईल. म्हणजेच राहू आणि बुध एकत्र मेष राशीत संक्रमण करतील. वृषभ राशीतील प्रवास पूर्ण करून ४ दिवसांनी म्हणजे १२ एप्रिल २०२२ रोजी राहू मेष राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात राहुला पाप ग्रह मानले जाते,