Rashi Privartan October 2022: ऑक्टोबरमध्ये अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या राशीतील बदलांचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध २१ ऑगस्ट २०२२ पासून कन्या राशीत विराजमान आहे आणि २६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत तिथेच राहील. या काळात अनेक राशीच्या लोकांना बुध ग्रहाचा आशीर्वाद मिळू शकतो. करिअरमध्ये यशासह प्रगतीही होऊ शकते. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

मेष राशी

या राशीच्या लोकांसाठी बुध सहाव्या आणि तिसऱ्या घराचा स्वामी आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. आरोग्यासाठीही हा काळ चांगला राहील असं दिसून येतंय.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
deepika padukone ranveer singh christmas celebration with baby Dua
Christmas 2024: वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा फोटो; दीपिका-रणवीरने मुलीसह ‘असं’ केलं सेलिब्रेशन
Aries To Pisces Horoscope Today in Marathi
२६ डिसेंबर पंचांग: शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी १२ पैकी ‘या’ राशींना लक्ष्मीकृपेने मिळेल मेहनतीचे फळ; तुमच्या कुंडलीत धन की कष्ट?
Surya Nakshatra Gochar 2024
२९ डिसेंबरपासून मिळणार छप्परफाड पैसा! सूर्यदेवाच्या कृपेने चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब

( हे ही वाचा: १८ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ तीन राशी असतील भाग्यवान; प्रचंड धनलाभासोबत मिळेल नशिबाची मजबूत साथ)

वृषभ राशी

या राशीच्या लोकांसाठी बुध हा पाचव्या आणि दुसऱ्या घराचा स्वामी आहे. आर्थिकदृष्ट्या हा वेळ चांगला असेल आणि पैशांची बचतही होऊ शकते. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. रहिवाशांच्या मुलांचे आरोग्यही चांगले राहील. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे संक्रमण लाभदायक ठरू शकते.

मिथुन राशी

या राशीच्या लोकांसाठी मालमत्ता खरेदीसाठी हा अनुकूल काळ ठरणार आहे. वैयक्तिक जीवनासाठीही हा काळ चांगला असू शकतो. घरात शांततेचे वातावरण राहील. या काळात कुटुंबातील सदस्यांसह तुमची सुट्टी देखील चांगली असू शकते. यावेळी आईची साथ मिळू शकते.

( हे ही वाचा: बुध ग्रह होणार आहेत मार्गी; जाणून घ्या कोणत्या राशींना होईल फायदा आणि कोणाला होईल नुकसान)

कर्क राशी

या राशीच्या लोकांसाठी बुध तिसऱ्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे. लेखन इत्यादी क्षेत्राशी संबंधित लोकांना या काळात यश मिळू शकते. या काळात तुम्ही तुमच्या प्रवासाचे नियोजन देखील करू शकता. नात्यात गोडवा येऊ शकतो.

वृश्चिक राशी

या काळात या राशीच्या लोकांना आर्थिक उन्नती होऊ शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. लोकांची सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढू शकते.

Story img Loader