वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा उदय होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. बुद्धी आणि व्यवसायाचा कारक असलेला बुध ग्रह १२ एप्रिल रोजी मेष राशीत आला आहे. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. वैदिक ज्योतिषात बुध ग्रह वाणिज्य, लेखन, अँकरिंग, वकील, पत्रकारिता, कथा सांगणारा, प्रवक्ता इत्यादींशी संबंधित आहे. त्यामुळे बुध ग्रहाच्या उदयामुळे या क्षेत्रांवर विशेष प्रभाव पडेल. या बदलाचा सर्व राशींवर देखील परिणाम होईल. पण तीन राशी आहेत त्यांना विशेष फायदा होऊ शकतो, जाणून घेऊयात

मिथुन: बुध ग्रहाचा उदय तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या अकराव्या घरात बुधचा उदय होत आहे. या स्थानाला नफा आणि उत्पन्नाचं स्थान म्हटलं जातं. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. व्यवसायात लाभ होईल. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. आणि ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. तुम्ही तुमच्या बुद्धीने पैसा कमवण्यात यशस्वी व्हाल.

कर्क: बुध ग्रहाचा तुमच्या राशीत दहाव्या स्थानात उदय झाला आहे.या स्थानाला कर्म आणि नोकरीचा स्थान म्हणतात. त्यामुळे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. यासोबतच बुध तुमच्या तिसऱ्या घराचा स्वामी आहे. या स्थानाला पराक्रम आणि भावंडांचे स्थान म्हणतात. त्यामुळे यावेळी तुमची ताकद वाढेल. यासोबतच गुप्त शत्रूंचा नाश होईल आणि भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल.

Surya Gochar: सूर्य मंगळाच्या राशीत करणार प्रवेश, ‘या’ राशींना होणार फायदा

मीन: तुमच्या संक्रमण कुंडलीत बुध दुसऱ्या स्थानात आला आहे. या स्थानाला धन आणि वाणीचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यासोबतच तुमच्यासाठी अडकलेले पैसेही या काळात मिळू शकतात. दुसरीकडे, जे धर्मोपदेशक, वकील आणि मार्केटिंग क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ चांगला जाणार आहे. तसेच, या काळात व्यवसायात नवीन करार निश्चित होऊ शकतो. तसेच बुध तुमच्या सातव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो.

Story img Loader