वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा त्याचा उदय होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. बुद्धी आणि व्यवसायाचा कारक असलेला बुध ग्रहाचा १२ एप्रिल रोजी मेष राशीत उदय होणार आहे. बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा बुध १८ मार्च रोजी अस्त झाला आहे. खरं तर, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ येतो तेव्हा त्याची शक्ती कमी होते. म्हणजेच अस्ताला जातो आणि जेव्हा सूर्यापासून दूर जातो उदय होतो. त्यामुळे बुध ग्रहाच्या उदयाचा सर्व राशींवर परिणाम होईल. पण तीन राशी आहेत, त्यांना या काळात विशेष लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत तीन राशी.
मिथुन: बुध ग्रहाचा उदय तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या अकराव्या घरात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात आणि व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. दुसरीकडे, मिथुन राशीवर बुधाचे राज्य आहे आणि ज्योतिष शास्त्रात बुध हा व्यवसाय कारक ग्रह असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बुधाच्या उदयामुळे तुम्हाला व्यवसायात चांगले पैसे मिळू शकतात.
कर्क: तुमच्या कुंडलीतील दशम भावात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. या स्थानाला कर्म आणि करिअरचे स्थान म्हणतात. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. यासोबतच या काळात तुमची प्रमोशन होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. परदेशातून आर्थिक लाभ होऊ शकतात. यावेळी तुमची कार्यशैली देखील सुधारेल, तसेच तुमच्या कामाचं ऑफिसमध्ये कौतुक होईल.
Rahu Gochar: मेष राशीत राहु ग्रह १२ एप्रिलपासून दीड वर्षे मांडणार ठाण, ‘या’ राशींना मिळणार फायदा
मीन: बुध तुमच्या राशीत दुसऱ्या स्थानात असणार आहे. या स्थानाला धन आणि वाणीचे घर म्हणतात. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, तुमचे पैसे अडकले असतील तर ते या काळात मिळू शकतात. ज्या लोकांची कारकीर्द भाषणाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, वकील, मार्केटिंग शिक्षक, त्यांच्यासाठी हा काळ उत्कृष्ट ठरू शकतो. दुसरीकडे, मीन राशीच्या लोकांना व्यवसायात चांगले यश मिळू शकते.