Budh grah Uday : ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी ग्रह मानला जातो. तसेच बुध देव व्यवसाय, बुद्धी, तर्क शक्ती, अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि गणिताचा कारक मानला जातो. त्यामुळे बुध ग्रहाची चाल जेव्हा बदलते तेव्हा खास करून या क्षेत्रावर खास प्रभाव पडतो. २१ फेब्रुवारीला बुध ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्यामुळे तीन राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो आणि करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

मेष राशी (Aries Zodiac)

बुध ग्रहाचे उदित होणे या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण बुध ग्रह या राशीच्या इनकम आणि लाभ स्थानावर उदित होणार आहे. त्यामुळे या वेळी या लोकांच्या पगारात जबरदस्त लाभ होऊ शकतो. तसेच जे विद्यार्थी अभ्यासात समस्येचा सामना करत आहे त्यांना मार्ग मिळतील. राजकारणाशी जुळलेले लोकांची वादविवादातून सुटका होईल. गुरू म्हणून काम करणाऱ्या लोकांना नवीन ऊर्जा मिळेल. तसेच या वेळी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना लाभ मिळेन. या दरम्यान जे लोक शेअर बाजार, लॉटरीमध्ये गुंतवणूक करत असेल त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे.

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

बुध देवाचे उदित होणे या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. कारण बुध देव या राशीच्या सुध साधनाच्या स्थानावर उदित होणार आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना सुख सुविधांमध्ये वृद्धी होऊ शकते. तसेच दीर्घ काळापासून अडकलेले काम पूर्ण होतील. जर यांचे काम किंवा व्यवसाय रिअल स्टेट, प्रॉपर्टी किंवा जमीन संपत्तीशी जुळलेले असेल तर यांना फायदा होऊ शकतो. या लोकांचे आईवडिलांबरोबर संबंध मजबूत होतील. या वेळी हे लोक लक्झरी वस्तू खरेदी करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना करिअरबाबत टेन्शन असेल त्यांचे टेन्शन दूर होईल. वित्तीय क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांमध्ये व्यावसायिकांना मोठे यश मिळू शकते.

कुंभ राशी (Kumbh Zodiac)

बुध ग्रहाचे उदित होणे कुंभ राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक ठरू शकते. कारण बुध ग्रह या लोकांच्या गोचर कुंडलीच्या लग्न भावामध्ये उदित होत आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांची कार्यक्षमता दिसून येईल. तसेच हे लोक अतिशय लोकप्रिय होतील. समाजाता या लोकांचा मान सन्मान तसेच प्रतिष्ठा वाढेन. नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा डीलमुळे व्यावसायिकांना मोठा लाभ मिळू शकतो. तसेच विवाहित लोकांचे वैवाहिक आयुष्य सुंदर दिसून येईल. अविवाहित लोकांना विवाहाचे योग जुळून येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader