Budh Dev Transit In Makar: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जेव्हा नक्षत्र व राशी परिवर्तन करतात तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येऊ शकतो. काही मंडळींसाठी हे ग्रह गोचर अत्यंत शुभ ठरू शकते तर काहींना मात्र या काळात अपार कष्ट सहन करावे लागू शकतात. येत्या फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच बुध देव मकर राशीत प्रवेश घेणार आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार मकर ही शनिची रास म्हणून ओळखली जाते. बुध ग्रह व शनि यांच्यात मित्रत्वाचे नाते आहे यामुळे बुध ग्रह व शनिचा प्रभाव एकत्रितरित्या काही राशींना समृद्ध करू शकतो. येत्या काळात ३ अशा राशी आहेत ज्यांना ज्या ग्रह गोचरचा फायदा धनलाभाच्या रूपात होण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या जाणून घेऊयात..
धनु (Dhanu Zodiac)
धनु राशीसाठी बुध ग्रह गोचर हे शुभ व फलदायी सिद्ध होऊ शकते. बुध ग्रह गोचर करून आपल्या राशीच्या प्रभावकक्षेत दुसऱ्या स्थानी स्थिर होणार आहे. हे स्थान वाणी व धनप्राप्तीचे स्थान मानले जाते. यामुळेच येत्या काळात आपल्या संवाद कौशल्याच्या बळावर आपल्याला प्रचंड धनलाभ होऊ शकतो. तसेच कामाच्या ठिकाणी सुद्धा अचानक मोठी जबाबदारी व आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही उधार दिलेले पैसे न मागता परत मिळण्याची शक्यता आहे. ज्यांचे काम वाणीशी संबंधित आहे म्हणजेच शिक्षक, मीडिया क्षेत्र, मार्केटिंग यांसाठी बुध ग्रह गोचर अत्यंत लाभदायक ठरू शकते.
वृषभ (Taurus Zodiac)
बुध ग्रह राशि परिवर्तन करताच वृषभ राशीच्या मंडळींसाठी शुभ काळ सुरु होऊ शकतो. बुध ग्रहाचे गोचर हे आपल्या राशीच्या प्रभावकक्षेत नवव्या स्थानी होत आहे. यामुळेच ही स्थान धर्म व अध्यात्माशी संबंधित मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला येत्या काळात निष्ठेतून धनलाभ होण्याची संधी आहे. आपल्या नशिबाची जोरदार साथ लाभू शकते. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना येत्या काळात प्रगतीचे योग आहेत. आपल्याला कार्यस्थळी मान व धन एकत्र लाभू शकते.
हे ही वाचा<< ३० वर्षांनी शनिदेव नक्षत्र बदलणार; ‘या’ तारखेपासून ३ राशी बक्कळ धनलाभासह होऊ शकतात श्रीमंत
मीन (Pisces Zodiac)
मीन राशीसाठी बुध ग्रहाचे गोचर शुभ ठरू शकते. आपल्या राशीच्या प्रभावकक्षेत बुध ग्रहाचे गोचर हे ११ व्या स्थानी होणार आहे. हे स्थान इनकमी व लाभाचे स्थान माले जाते. आपल्या आर्थिक मिळकतीत येत्या काळात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काळात जुन्या गुंतवणुकीतून आपल्याला प्रचंड लाभ होऊ शकतो. भागीदारीने आपल्याला लाभ होण्याची संधी मिळेल. तुम्हाला व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो. शेअर बाजारातून गुंतवणुकीसाठी सुद्धा येणारा काळ लाभदायक ठरू शकतो पण त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)