Budh- Guru Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव समस्त भूतलावर व मानवी प्रजातींवर दिसून येऊ शकतो. ग्रहांच्या स्थितीनुसार त्याचा प्रभाव अनेकदा शुभ- अशुभ असा बदलतो. अनेकदा काही राशींच्या गोचर कुंडलीत एकाहून अधिक ग्रह येऊन युती सुद्धा साधतात, यामुळे त्या राशीवरच नव्हे तर एकूणच १२ राशींवर काही अंशी प्रभाव आढळतो. अशीच एक युती पुढील महिनाभर कायम असणार आहे. ग्रहांचे राजपुत्र बुध देव व त्यांच्यासह बृहस्पती गुरुदेव हे मीन राशीत एकत्र आले आहेत. मीन हे मुळात गुरुची रास असून याच आठवड्यात १६ मार्चला बुध ग्रहाने मीन राशीत प्रवेश घेतला आहे. या युतीचा फायदा काही नशीबवान राशींना होणार असल्याचे समजतेय. तुमच्याही राशीला पुढील महिनाभर काय कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया…
१६ एप्रिल पर्यंत ‘या’ राशींना श्रीमंतीची संधी
वृषभ रास (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या गोचर कुंडलीत ११ व्या स्थानी बुध ग्रह भ्रमण करत आहे. तर याच ठिकाणी गुरुदेव अगोदरच स्थिर आहेत. या युतीने वृषभ राशींच्या मंडळींना अनपेक्षित व अमाप धनलाभ होण्याचा योग आहे. तुम्हाला येत्या काळात लक्ष्मीचे पाठबळ अनुभवता येऊ शकते. कामाच्या ठिकाणी प्रमोशनसह पगारवाढ होण्याची संधी आहे. शिक्षणाशी संबंधित काम असलेल्यांना अधिक यश लाभू शकते.
मिथुन रास (Gemini Zodiac)
मिथुन राशीच्या विशेषतः बँकिंग व मार्केटिंगशी निगडित मंडळींना आभाळाइतके सुख अनुभवता येऊ शकते. तुमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुम्हाला कुटुंबाइतके जवळून सांभाळू शकतील. मानसिक सुखाने समृद्ध असा काळ अनुभवता येऊ शकतो.
कन्या रास (Virgo Zodiac)
बुध-गुरुची युती होताच कन्या राशीच्या मंडळींना आर्थिक स्थितीत सुधार अनुभवता येणार आहे. याची सुरुवात हळू हळू होईल पण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच भरपूर धनलाभ होऊ शकतो. तुमची नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. जोडीदाराच्या मदतीने काही कामे मार्गी लागू शकतील.
धनु रास (Sagittarius Zodiac)
गुरु व बुधाची युती धनु राशीसाठी शुभ वार्ता घेऊन येऊ शकते. धनु राशीच्या मंडळींना भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. कौटुंबिक सुखाचाही वर्षाव होऊ शकतो. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ शुभ ठरू शकतो. आईची खास सहकार्य लाभेल.
हे ही वाचा<< “एकनाथ शिंदेंची कुंडली सांगते, एप्रिलमध्ये पाच मोठे…” ज्योतिषतज्ज्ञांकडून जाणून घ्या मुख्यमंत्र्यांचे भविष्य
मीन रास (Pisces Zodiac)
बुध व गुरुची युती आपल्याच राशीत होत आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांची मनधरणी करावी लागू शकते. पण तुम्ही डोकं थंड ठेवून निर्णय घेतल्यास तुम्हाला प्रचंड मोठी यशाची संधी लाभू शकते.
(टीप: वरील दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)