mercury margi 2023 in leo : बुध ग्रहाला ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजकुमार म्हटले गेले आहे. शिवाय बुध ग्रहाला संपत्ती, व्यवसाय, वाणी, बुद्धिमत्ता, संवादाचा कारक मानले जाते. यामुळे ज्या लोकांच्या राशीत बुध शुभ स्थानी असतो ते उत्तम व्यापारी, संवाद कलेमध्ये निपुण आणि तर्कशास्त्रात निपुण असतात; तर अशुभ बुध राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये नुकसान होते, अपयश मिळते. तसेच संभाषणात अडथळे येतात. यावेळी बुध सिंह राशीत असून वक्री चाल चालणार आहे. १६ सप्टेंबर २०२३ पासून बुध थेट सिंह राशीत प्रवेश करेल. बुधाची मार्गी चाल काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बुधाच्या थेट राशी बदलामुळे खालील चार राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे.
१ ) मेष – बुधाची मार्गी चाल मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. या लोकांना व्यवसायात फायदा होईल असे समजते. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारण्यासह लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी मिळू शकते. काही चांगली बातमी मिळू शकते. अडकलेला पैसा परत मिळू शकतो.
२) मिथुन – मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि योग्य स्थितीत राहून या लोकांना भरपूर लाभ देईल असे समजतेय, करिअरमध्ये आलेल्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. काही कामं पुन्हा मार्गी लागल्यास नोकरी बदलण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी ट्रान्सफर केले जाऊ शकते. व्यावसायिकांसाठी काळ विशेषतः शुभ मानला जातोय, कारण त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Chanakya Niti: पतीने स्वत: संबंधित ‘या’ चार गोष्टी पत्नीला चुकूनही सांगू नये; अन्यथा…
३) सिंह – बुध ग्रहाची मार्गी चाल सिंह राशीच्या लोकांना खूप फायदेशीर ठरू शकते. त्यांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. पद, प्रतिष्ठा आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे. शिवाय परदेशात जाण्याची संधी मिळू शकेल. समाजात मान-सन्मान वाढेल अशा घटना घडू शकतात. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय बँक बॅलन्स वाढू शकतो. शिवाय आर्थिक लाभाचे योग येऊ शकतात.
४) तूळ – तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाचे मार्गी होणे भरपूर लाभदायी ठरू शकते. तुमच्या नोकरीत बदल होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सुवर्ण संधी मिळू शकतात. तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे; यातून तुम्हाला स्वतःसाठी सर्वोत्तम पर्याय निवडण्याची संधी मिळू शकते. योग्य निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. शिवाय व्यवसायात तेजी येण्याची शक्यता आहे.