Budh Nakshatra Parivartan 2025 : ज्योतिष्यशास्त्रामध्ये बुध देवाला ग्रहांचा राजकुमार मानला जाते. बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, तर्कशास्त्र आणि त्वचा यांचा कारक मानला जातो. कुंडलीमध्ये त्यांच्या प्रभावामुळे व्यक्तीची शिक्षण, करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती होते. ज्योतिष्यशास्त्रानुसार, बुध देव मिथून आणि कन्या राशीचे स्वामी आहे ज्यामुळे या राशीच्या लोकांवर विशेष कृपा होऊ शकते. पण जेव्हा बुध राशीचे परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करते तेव्हा या सर्व १२ राशी शुभ-अशुभ फळ प्राप्त करतात.

आता पुन्हा एकदा बुध देव गोचर करणार आहे. २७ एप्रिल २०२५मध्ये रेवती नक्षत्रामध्ये बुध गोचर करणार आहे. रेवती नक्षत्राचा स्वामी ग्रह गुरु आहे. अशा स्थितीमध्ये बुध ग्रहाचे गुरच्या नक्षत्रामध्ये प्रवेश काही राशईंच्या लोकांसाठी लाभदायी सिद्ध होऊ शकतो. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे या लोकांच्या नोकरी आणि गुंतवणूकीमध्ये मनासारखा लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला त्या भाग्यशाली राशीच्या बाबत जाणून घ्या…

वृषभ राशी (Taurus Zodiac Sign)

ज्योतिषांच्या मते, रेवती नक्षत्रात बुध ग्रहाचे गोचर वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगले फायदे देऊ शकते. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे यश मिळण्याची शक्यता वाढेल. कुटुंबात सुख आणि समृद्धी राहील. हा काळ विद्यार्थ्यांसाठी विशेषतः अनुकूल राहील, त्यामुळे त्यांना शिक्षण क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील आणि त्यांचे ज्ञान वाढेल.

कर्क राशी (Cancer Zodiac Sign)

या गोचरमुळे कर्क राशीच्या लोकांना गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि विवेकाचा वापर करून भूतकाळात झालेल्या चुका सुधारू शकाल. जर एखादा कायदेशीर खटला प्रलंबित असेल तर तो निकाली निघण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. परीक्षेचा निकाल अनुकूल असल्यास मानसिक ताण कमी होईल आणि मन आनंदी राहील. विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमातून पुरस्कार मिळू शकतात. याशिवाय वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्याचे योग देखील निर्माण होत आहेत.

धनु राशी (Sagittarius Zodiac Sign)

रेवती नक्षत्रात बुधाचे गोचर धनु राशीच्या लोकांच्या नशिबात सकारात्मक बदल आणू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक सहली यशस्वी होतील आणि नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरी मिळू शकते. आधीच नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी आदर आणि पदोन्नती मिळू शकते. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल आणि व्यवसाय सुरू करणाऱ्यांच्या योजना यशस्वी होतील.