Mesh Budh Margi 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा यंदाच्या वर्षातील ग्रहस्थितीत राजा पदी विराजमान असणार आहे. बुध हा बुद्धी, तर्क, संवाद व कलेचा कारक मानला जातो. कुंडलीमध्ये बुध शुभ स्थानी असल्यास कार्यस्थळी व विशेषतः बुद्धीच्या संबंधित कामांमध्ये विशेष लाभ होण्याची संधी असते. ही मंडळी आत्मविश्वासाने कलाक्षेत्रात मोठी कामगिरी करू शकतात. अशा लोकांमध्ये बुद्धीच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता असते. येत्या ५ दिवसात म्हणजेच १५ मे २०२३ ला बुध ग्रह मार्गी होणार आहे. सध्या ग्रहस्थितीमध्ये बुध देव वक्री झालेले आहेत तर आता १५ मे ला मेष राशीत बुध सरळ दिशेत मार्गक्रमण करणार आहेत. काही राशींसाठी येणारा एक महिना यामुळेच अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो.

बुधदेव मार्गी होऊन ‘या’ राशींचे नशीब बदलणार?

मेष रास (Aries Zodiac)

मेष राशीच्या मंडळींना स्वतःच्या व्यक्तिमत्वात बदल जाणवू शकतो. तुम्हाला आत्मविश्वास व नव्या गोष्टींची जाणीव होऊ शकते. समाजात यामुळे तुम्हाला मान- सन्मान वाढीस लागू शकतो. अविवाहित मंडळींना लवकरच लग्नाचे स्थळ येऊ शकते. रवी आपल्या मेष राशीत उच्च स्थितीत आहे. परंतु रावीसह राहू आणि हर्षलदेखील असल्याने कोणताही निर्णय घेताना दोन वेळा विचार करावा. शुक्र शनीच्या शुभ योगामुळे कामानिमित्त प्रवास कराल. कामातील नव्या संकल्पना राबवण्यापूर्वी मार्केट संशोधन उपयोगी ठरेल. योग्य जोडीदाराची निवड करण्यास चांगले ग्रहबल मिळेल.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
After 12 years the alliance of Jupiter and Moon will brighten the fortunes of 4 zodiac signs dreams will be fulfilled in 2025
१२ वर्षांनंतर गुरू आणि चंद्रच्या युतीने ४ राशींचे भाग्य उजळणार, २०२५मध्ये स्वप्न होतील पूर्ण, घर-वाहन खरेदीचा निर्माण होईल योग
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी
Surya Grahan 2025 And Shani Gochar
१०० वर्षांनंतर निर्माण होणार शनी गोचर आणि सुर्य ग्रहाचा संयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळेल यश
shukra vakri 2025
२०२५ मध्ये शनीसह हे चार ग्रह देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींचा सुरू होणार सुवर्ण काळ
Budh Margi 2024
आजपासून बुधाचा जबरदस्त प्रभाव देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि मानसन्मान

वृषभ रास (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या मंडळींना बुध संपत्तीसंबंधित एखादी आनंदाची बातमी देऊ शकतो. तुम्हाला प्रॉपर्टी व वाहन खरेदीचे योग आहेत. तुमच्या घराचे किंवा एकंदरीत वास्तव्याचे स्वरूप बदलू शकते. नोकरदार मंडळींना आपल्या मेहनतीचे प्रचंड लाभदायक फळ मिळू शकते. पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे. द्वितीय स्थानातील मिथुन राशीतील शुक्र बुद्धीचातुर्य आणि गोड शब्दांनी प्रिय व्यक्तींचे मन जिंकेल. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे ठरेल. दशमातील शनी नोकरी व्यवसायातील खाचखळग्यांची पूर्वसूचना देईल.

कर्क रास (Cancer Zodiac)

बुध ग्रह सरळ मार्गीक्रमण करताच कर्क राशीचा मान- सन्मान वाढू शकतो. आपल्या कामाचा वेग वाढू शकतो. लोक तुमचे कौतुक करून तुमच्या गुणांचे चाहते होऊ शकतात. लाभ स्थानातील शुक्र आणि व्यय स्थानातील मंगळ यांमुळे अतिरिक्त खर्च कराल. प्रवास, यात्रा ,स्नेहसंमेलने यात सहभागी व्हाल. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक प्रश्न हळुवार सोडवावे लागतील. मुलांना धीर द्याल. त्यांचा आत्मविश्वास वाढवाल. नोकरी व्यवसायात रवी साहाय्यकारी ठरेल. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा. गुरुबल चांगले आहे. प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक नियोजन उपयोगी पडेल. ओळखीमुळे स्थावर मालमत्तेची कामे पुढे सरकतील.

कन्या रास (Virgo Zodiac)

अष्टम स्थानात पाच ग्रह एकत्र आहेत. अडीअडचणींचा सामना करता करता दमून जाल. मार्ग न सुचल्याने हतबल व्हाल. अशा परिस्थितीत दशम स्थानातील शुक्र आशेचा किरण दाखवेल. महिन्याच्या मध्यानंतर रवीची मदत मिळाल्याने हळूहळू स्थिरस्थावर व्हाल. जोडीदाराला आपल्या आधाराने उभारी द्यावी लागेल. मुलांना शिस्तीचा बडगा दाखवाल. विवाहोत्सुक मंडळींनी गुरुबल कमजोर असल्याने धीराने घ्यावे. नोकरी बदलू नका. आहे त्या परिस्थितीत संयमाने राहावे. उन्हाळी सर्दी आणि अपचनाचा त्रास भेडसावेल.

हे ही वाचा<< शनी जयंतीपासून वर्षभर ‘या’ राशींना अमाप पैसा व श्रीमंती लाभणार? ‘या’ शुभ मुहूर्तावर जुळणार पाच राजयोग

धनु रास (Sagittarius Zodiac)

विवाहित मंडळींना एकमेकांसाठी वेळ देता येईल. रुसवे फुगवे दूर होतील. विद्यार्थी वर्गाच्या उच्च शिक्षणासाठी ग्रहमान अनुकूल आहेत. मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी व्यवसायात मानसन्मान आणि धनसंपत्ती मिळेल. गुंतवणूकदारांना महिन्याच्या मध्यानंतर चांगला परतावा मिळेल. पण मोठी जोखीम स्वीकारू नका. कौटुंबिक समस्या सोडवताना वडीलधाऱ्या मंडळींची मदत होईल. विवाहोत्सुक मंडळींच्या शुभ वार्ता समजातील. मनाविरुद्ध घटनांचा डोक्यात राग घालून घेणे योग्य नाही.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader