Vipreet Raj Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह वृश्चिक राशीत विरामान झाला. त्यामुळे ‘विपरित राजयोग’ तयार झाला आहे. हा राजयोग काही राशींसाठी शुभ वार्ता घेऊन येणारा ठरु शकतो. संपत्तीत वाढ होऊन करिअरमध्ये उत्तम संधी मिळू शकतात. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ तीन राशींच्या लोकांच्या संपत्तीत होणार वाढ?

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना विपरीत राजयोग बनल्याने या काळात मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात खूप मोठा फायदा होऊ शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. नोकरीमध्ये नवीन कामाची ऑफर किंवा पदोन्नती मिळू शकते. घरात सुख-समृद्धी नांदू शकते.

(हे ही वाचा: ५ वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने पुढील १ महिना ‘या’ राशींना होऊ शकतो आकस्मिक धनलाभ; उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता )

कन्या राशी

बुधदेवाच्या गोचरमुळे कन्या राशीवर सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक संकटातून सुटका होऊन बहुतांश कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होऊ शकतात. तरुणांना करिअरशी संबंधित चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाची नवीन साधने तयार होऊ शकतात. बँक बॅलन्स वाढू शकतो. वैयक्तिक जीवनात शांती आणि आनंद मिळू शकतो.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांना करिअरशी संबंधित उत्कृष्ट संधी मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत अनपेक्षित नफा मिळण्याची अपेक्षा आहे. अडकलेली कामे मार्गी लागून कामात प्रगती होऊ शकते. कमाईचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. घरातही सुख, शांती आणि समृद्धी नांदू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budh planet made vipreet rajyog these three zodiac signs bank balance to raise money marathi astrology pdb