Vipreet Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करत शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो. बुध ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. याउलट राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. परंतु अशा ४ राशी आहेत, ज्यांना या काळात लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
मेष राशी
तुमच्या लोकांना विपरीत राजयोग बनणे फायदेशीर ठरू शकते. कारण बुध तुमच्या तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे आणि तो शुभ स्थानात स्थित आहे. सूर्य आणि शनि देखील एकत्र बसलेले आहेत. म्हणूनच यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, अचानक लाभ होऊ शकतो. यावेळी तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता. तसेच तुम्हाला मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क राशी
विपरीत राजयोग तयार झाल्यामुळे कर्क राशीच्या लोकांचे भाग्य चमकू शकते. कारण तुमच्यासाठी बाराव्या घराचा आणि तिसर्या घराचा स्वामी बुध आहे. त्यामुळे जर तुमची बुध दशा चालू असेल तर तुम्हाला व्यवसायात प्रचंड नफा होईल. तसंच कमाई दुप्पट होऊ शकते. यासोबतच करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते. यासोबतच तुमच्याकडून थांबलेली कामे पूर्ण होतील. त्याच वेळी, तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल.
कन्या राशी
विपरीत राजयोग तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी सिद्ध होऊ शकतो. कारण बुध शनि आणि सूर्यासोबत सहाव्या भावात बसला आहे. त्यामुळे अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यासोबतच कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. परंतु यावेळी तुमचे आरोग्य बिघडू शकते त्यामुळे काळजी घ्या..
( हे ही वाचा: १ मार्चपासून ‘या’ ३ राशी होणार गडगंज श्रीमंत? माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो भरपूर पैसा)
धनु राशी
विपरीत राजयोग तयार झाल्यामुळे धनु राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण बुध तुमच्या तिसऱ्या घरात बसला आहे. त्यामुळे बेरोजगारांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. यासोबतच नोकरदारांना वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. पण जोडीदाराची तब्येत थोडी बिघडू शकते. त्याच वेळी, तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. मोठी डील फायनल होऊ शकते. त्यामुळे भविष्यात लाभाचे योग निर्माण होत आहेत.
(वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)