Budh Planet Transit 2022: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी भ्रमण करत असतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. १७ जुलै रोजी बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा बुध एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा व्यापार, शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे बुध ग्रहाच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल. पण ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा राशी बदल फायदेशीर ठरू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या ३ राशी…

मिथुन : तुमच्या गोचर कुंडलीतून बुध ग्रहाने द्वितीय स्थानात प्रवेश केला आहे. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच व्यवसायात महत्त्वाचा करार निश्चित होऊ शकतो. ज्यामुळे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तसंच या काळात तुम्ही भागीदारीचे काम सुरू करू शकता. त्यात चांगला फायदा होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे भाषण आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणारे उदा. वकील, मार्केटिंग वर्कर आणि शिक्षक यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तसेच बुध ग्रह तुमच्या चौथ्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला आईची साथ मिळू शकते. तसेच त्यांच्यामार्फत पैसे मिळू शकतात. यावेळी तुम्हाला मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही ओपल किंवा पन्ना रत्न घालू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आणखी वाचा : सूर्य देवाचा कर्क राशीत प्रवेश, या ३ राशींचे चांगले दिवस सुरू होतील

कन्या : बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाने तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. एक कारण म्हणजे बुध तुमच्या राशीचा स्वामी आहे. दुसरे म्हणजे बुध तुमच्या राशीतून ११ व्या भावात प्रवेश करत आहे. ज्याला ज्योतिष शास्त्रात कुंडलीचे विशेष स्थान मानले जाते. तसेच त्याला उत्पन्न आणि नफ्याचे ठिकाण म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढेल. तसेच यावेळी तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले अपेक्षित यश मिळू शकते. त्याचबरोबर जीवनसाथीसोबतच्या नात्यात गोडवा दिसून येईल. या काळात उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. यावेळी तुम्हाला नशीबाची साथही मिळेल. तुम्ही पन्ना किंवा गोमेद रत्न घालू शकता, जे तुमच्यासाठी भाग्यवान रत्न ठरू शकते.

आणखी वाचा : सूर्य-शनीपासून बनलाय संसप्तक योग, या ४ राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या, जाणून घ्या उपाय

तूळ : बुध ग्रहाचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून दशम भावात प्रवेश करत आहे. जे व्यवसाय आणि नोकरीचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती किंवा वेतनवाढ मिळू शकते. यावेळी व्यवसायातही विस्तार होण्याची शक्यता आहे.

यासोबतच व्यवसायात नवीन नातीही तयार होऊ शकतात. ज्याचा तुम्हाला फायदा होईल असे वाटते. तुमची कार्यशैली देखील सुधारेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकतं. तुम्ही पन्ना किंवा ओपल स्टोन देखील घालू शकता, जो तुमच्यासाठी शुभ भाग्यवान दगड ठरू शकतो. पण, तुमच्या जन्मपत्रिकेत शुक्र आणि बुध यांचा संबंध कसा आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Story img Loader