Budh Gochar In Dhanu: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर दिसून येतो. यासोबतच ग्रहांचे संक्रमण होत असताना ते वेळोवेळी राजयोगही निर्माण करतात. ३ डिसेंबर रोजी बुध ग्रह धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे भद्र राजयोग निर्माण होणार आहे. या योगाची निर्मिती प्रत्येक राशीवर प्रभाव टाकेल. पण अशा ३ राशी आहेत, ज्यांना यावेळी व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते…
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी भद्र राजयोग लाभदायक ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून अकराव्या भावात प्रवेश करणार आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. म्हणूनच यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. यासोबतच उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात. नोकरदार आणि व्यावसायिक दोघांनाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तुम्ही राजकारणात सक्रिय असाल, तर तुम्हाला काही पद मिळू शकते. त्याचबरोबर शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला फायदा होऊ शकतो.
( हे ही वाचा: शनिदेवाच्या लाडक्या आहेत ‘या’ ५ राशी; साडेसाती आणि धैय्याचा कोणताही त्रास या लोकांना होत नाही)
मीन राशी
भद्र राजयोग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून दहाव्या भावात प्रवेश करणार आहे. जे नोकरी आणि व्यवसायाचे ठिकाण मानले जाते. म्हणूनच तुम्हाला यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. दुसरीकडे नोकरदारांनाही नवीन संधी मिळतील. दुसरीकडे, व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. यासोबतच तुम्हाला मोठा नफाही मिळू शकतो.
मेष राशी
भद्र राजयोग तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या राशीतून नवव्या भावात बुध ग्रहाचे भ्रमण होणार आहे. जे भाग्य आणि परदेशी स्थान मानले जाते. बुधाचे संक्रमण होताच तुमचे नशीब नक्कीच बदलेल. अभ्यास किंवा करिअरच्या निमित्ताने तुम्ही परदेशातही जाऊ शकता. त्याचबरोबर स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. तो कोणत्याही स्पर्धेत उत्तीर्ण होऊ शकतो. मान-सन्मानात वाढ होईल आणि सामर्थ्य वाढतच जाईल. यावेळी तुम्ही पन्ना दगड घालू शकता, जो तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो.