Budh Planet Transit In Tula: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि जगावर दिसून येतो. २६ ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर, व्यवसायावर आणि अर्थव्यवस्थेवर दिसून येईल. त्याच वेळी अशा तीन राशी आहेत, ज्यांना या काळात व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते. चला जाणून घेऊया या राशींबद्दल…
कन्या राशी
बुध ग्रहाचे संक्रमण तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात होणार आहे. या काळात तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. तसेच, या काळात तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहील. त्याच वेळी आईशी तुमचे नाते सुधारेल. तसेच, व्यवसाय करणाऱ्यांसाठी, विशेषतः कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. या काळात तुम्हाला सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा मिळू शकते. दुसरीकडे, ज्या लोकांचे करिअर भाषण आणि विपणन क्षेत्राशी संबंधित आहे, अशा लोकांसाठी हा काळ चांगला असू शकतो.
( हे ही वाचा: Shadashtak Yoga: शनि आणि मंगळ मिळून बनवणार ‘अशुभ षडाष्टक योग’; ‘या’ ४ राशींच्या वाढू शकतात समस्या, वेळीच सावध व्हा!)
कुंभ राशी
तूळ राशीमध्ये बुध ग्रहाचे भ्रमण होताच तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढू शकतो, ज्यामुळे तुम्ही करिअर क्षेत्रात नवीन उंची गाठू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. त्याच वेळी, बुध ग्रहाचे संक्रमण तुमच्या राशीतून दहाव्या भावात असेल. त्यामुळे बेरोजगारांना नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच या काळात कामाच्या ठिकाणी तुमची स्तुती होऊ शकते. म्हणजे तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळू शकते.
धनु राशी
बुध ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर सिद्ध होऊ शकते. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. व्यवसायात नवीन डील फायनल होऊ शकते. शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. प्रेमसंबंधांमध्ये, आपल्या जोडीदाराशी जवळीक वाढू शकते. दुसरीकडे, जे लोक राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांच्या जीवनात मोठा बदल दिसू शकतो. त्याचबरोबर यावेळी नशीबही तुमची साथ देत असल्याचे दिसते.