Budh Uday in Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह उदय आणि अस्त होतात. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, वाणी, संवाद आणि अर्थव्यवस्थेचा कारक मानला जातो. ज्यावेळी बुध ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल होते, तेव्हा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर त्याचा परिणाम होताना दिसतो. आता येत्या १० मार्चला ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा मीन राशीमध्ये उदय होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या उदयामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
‘या’ राशींचे भाग्य चमकणार?
वृषभ राशी
बुधाचा उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. व्यावसायिकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात मोठा धनलाभ होऊ शक्यता आहे. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांचे लग्न ठरु शकतात. वडिलोपार्जित संपत्तीच्या विक्रीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : येत्या दोन महिन्यात माता लक्ष्मी ‘या’ ५ राशींना देणार अपार धन? ‘गजलक्ष्मी राजयोग’ बनल्याने गडगंज श्रीमंती कोणाच्या नशिबात?)
मिथुन राशी
बुधाचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीसोबतच आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो आणि त्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुटुंब आणि जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. पैशाची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय शुभ असू शकतो. सुख, समृद्धी आणि कीर्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही नवीन स्त्रोतांकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. वैवाहिक जीवन आणि वाहनाचे सुख मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. अचानक जुने अडकलेले पैसे मिळू शकतात. व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)