Neechbhang And Mahadhan Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रह हे बारा राशीत भ्रमण करत असतात. प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या ग्रहांच्या भ्रमणामुळे कुंडलीत एखाद्या राशीत शुभ किंवा अशुभ योगही तयार होतात. येत्या नवीन वर्षात २०२४ मध्ये बुधदेव मीन राशीत गोचर करणार आहेत. बुधदेवाच्या गोचरामुळे ‘नीचभंग राजयोग’ आणि ‘महाधन राजयोग’ तयार होणार आहेत. ज्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच काही राशींना शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता असून येणारे नवे वर्ष सुखाचे ठरु शकते. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींचे भाग्य पालटणार?

वृषभ राशी

‘नीचभंग राजयोग’ आणि ‘महाधन राजयोग’ घडल्याने वृषभ राशीतील लोकांना या काळात नशिबाची पूर्णपणे साथ मिळू शकते. व्यवसायात अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात भौतिक सुखांचा लाभ मिळू शकतो. तुम्ही कोणत्याही कामात हात लावाल, त्यात तुम्हाला यश मिळू शकतो. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. या दरम्यान करिअर आणि व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो.

( हे ही वाचा : येत्या ५ दिवसात ‘या’ ३ राशींना मिळेल प्रचंड धनलाभाची संधी? ‘चंद्र-मंगळ योग’ बनल्याने मिळू शकतात आनंदाच्या बातम्या )

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी ‘नीचभंग राजयोग’ आणि ‘महाधन राजयोग’ लकी ठरु शकते. बुध गोचरमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होणार असून उत्पन्न प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात मोठी संधी मिळू शकते. घरातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभू शकते. 

कर्क राशी

दोन शुभ राजयोग घडल्याने कर्क राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ यशाचा ठरु शकतो. विद्यार्थ्यांना त्यांचा मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता असून प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळू शकते. समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. विवाह इच्छुकांना आवडता जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी यश आणि आनंद घेऊन येणारे ठरु शकते. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budh planet will make neechbhang and mahadhan rajyog postive impact of these three zodiac signs bank balance to raise money pdb