Surya Gochar 2023: ग्रहांचा राजा सूर्य हा सध्या मिथुन राशीत स्थिर झाला आहे. यामुळे येत्या काळात काही राशींच्या भाग्यात प्रचंड धनलाभ व प्रगतीचे योग दिसून येत आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीत सूर्यदेव १७ जुलै पर्यंत स्थिर असणार आहे, ही रास मुळात बुधाची असल्याने या राशीतील सूर्याचे वास्तव्य हे अत्यंत पॉवरफुल बुधादित्य राजयोग तयार करत आहे. १७ जुलैपर्यंत हा राजयोग कायम असणार आहे. यामुळे तीन अशा राशी आहेत ज्यांना मोठ्या संधी चालून येऊ शकतात. या राशीच्या लोकांना आयुष्यात एखाद्या व्यक्तीच्या रूपात धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. या व्यक्ती कोण असतील व या भाग्यवान राशी कोणत्या आहेत हे आपण सविस्तर पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधादित्य राजयोगाने १७ जुलैपर्यंत ‘या’ राशी होतील प्रचंड श्रीमंत?

कन्या रास (Virgo Zodiac Horoscope)

सूर्यदेवाच्या राशी परिवर्तनामुळे कन्या राशीच्या लोकांना मातृरूपी धनलाभ होऊ शकतो. आपल्या आयुष्यातील महिलांची प्रचंड भक्कम साथ लाभू शकते ज्यामुळे तुम्ही एखादा आयुष्य बदलून टाकणारा निर्णय घेऊ शकता. सूर्य देव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत दहाव्या स्थानी भ्रमण करत आहे ज्याचा प्रभाव तुमच्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा दिसून येऊ शकतो. मार्केटिंग, मीडिया, फायनान्स व शिक्षण या संबंधित काम करणाऱ्या मंडळींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक फायद्याची ठरू शकते तसेच तज्ज्ञांच्या मदतीने पैशाची अधिकाधीक गुंतवणूक करण्यावर भर द्या.

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

सूर्य हे आपल्या राशीचे स्वामी मानले जातात. यामुळे येत्या काळात सूर्याचा आपल्या राशीतील प्रभाव बुधादित्य राजयोगासह द्विगुणित होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला होणारा प्रत्येक लाभ हा दुपट्टीने आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. आपल्या भाग्यात शिक्षकाच्या म्हणजेच गुरुरूपी व्यक्तीच्या माध्यमातून यश व धनलाभाची चिन्हे आहेत. सूर्य आपल्या राशीत ११ व्या म्हणजेच इंकांच्या स्थानी भ्रमण करत आहे यामुळे साहजिकच येत्या काळात आपल्या आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढू शकतात.

हे ही वाचा<< शुक्र-चंद्राचा कलात्‍मक योग बनल्याने ‘या’ राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढणार? इच्छा पूर्ण होऊन अनुभवू शकता सुख

धनु रास (Sagittarius Zodiac Horoscope)

सूर्य देव मिथुन राशीत स्थिर असताना धनु राशीच्या मंडळींना बदलाचे संकेत आहेत. म्हणजेच आपल्याला कामाच्य, शिक्षणाच्या किंवा लग्नाच्या निमित्ताने स्थळ बदल करावा लागू शकतो. आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकते. आपल्याला प्रेमाच्या नात्यातून माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो. पती- पत्नीचे मन सांभाळून ठेवण्याची पूर्ण खबरदारी घ्या. धनु राशीच्या गोचर कुंडलीत सूर्याचे भ्रमण हे सप्तम स्थानी होत आहे ज्यामुळे आपल्याला वैवाहिक आयुष्यात गोडवा येऊ शकतो तसेच संतती सुखाची सुद्धा चिन्हे आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budh rashi surya yuti makes budhaditya rajyog these zodiac signs can feel achhe din with more money by love astrology svs