Weekly Horoscope Marathi 2 October to 8 October 2023: ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार १ ऑक्टोबर बुध ग्रह कन्या राशीत, २ ऑक्टोबरला शुक्र ग्रह सिंह राशीत तर ३ ऑक्टोबरला मंगळ ग्रह तूळ राशीत प्रवेश घेणार आहे. तीनही ग्रहांचे महत्त्व मोठे असल्याने या गोचरांचा प्रभाव राशिचक्रावर दिसून येऊ शकतो. ऑक्टोबरच्या पहिल्याच तीन मोठे ग्रह बदल होत असल्याने निश्चितच याचा प्रभाव १२ राशींवर दिसून येऊ शकतो. यानुसार ऑक्टोबरचा पहिला आठवडा म्हणेजच २ ते ८ ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी कसा असणार? आर्थिक, मानसिक, शारीरिक स्थिती कशी असेल याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

२ ते ८ ऑक्टोबर २०२३ आठवड्याचे राशिभविष्य (Weekly Rashi Bhavishya)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या मंडळींसाठी साहस व पराक्रमाचा हा आठवडा असणार आहे. नेहमी लक्षात ठेवा जेव्हा चांगला कालावधी असतो त्यावेळी आळस करून चालत नाही. या काळात तुम्ही नियमित मेहनत घेतल्यास आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. नोकरदार वर्गात कामाचा ताण कमी होईल. अनेक कामे सरळ मार्गी झाल्याने कामातील उत्साह वाढेल. जे काम हाती घ्याल ते काम त्वरित होईल. महिलांसाठी अडथळे दूर करणारा असा हा आठवडा असणार आहे.

3rd February 2025 Rashi Bhavishya In Marathi
३ फेब्रुवारी राशिभविष्य: व्यापारात होईल फायदा, मैत्रीची लाभेल साथ; वाचा १२ राशींच्या आठवड्याची कशी होणार सुरुवात?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ganesh Jayanti 2025 Date, Time Shubh muhurat in marathi
Maghi Ganesh Jayanti 2025 : माघी गणेश जयंतीची पूजाविधी आणि शुभ मुहूर्त काय? वाचा एका क्लिकवर
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Weekly Horoscope 27January To 2 Febuary 2025
Weekly Horoscope 27January To 2 February 2025: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ‘या’ ६ राशींचे उजळणार भाग्य! मिळणार चांगली बातमी, १२ राशींचे साप्ताहिक राशिभविष्य
shukra gochar 2025
धनलाभ होणार, बक्कळ पैसा मिळणार! १ फेब्रुवारीपर्यंत ‘या’ तीन राशींना शुक्र देणार भौतिक सुख अन् ऐश्वर्य

वृषभ रास (Taurus Horoscope)

आपल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणाकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे हा त्रास होणार नाही. व्यवसायात फायदा असला तरी श्रमही तेवढे असतील. मुळात तुम्हाला स्वतःमध्ये काही गुण आत्मसात करण्याची वेळ येईल, नव्या गोष्टी शिकण्यात कंटाळा करू नका. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी वेळापत्रक बदलावे लागेल. वायफळ खर्च टाळा. जोडीदार आनंदी असेल.

मिथुन रास (Gemini Horoscope)

आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन दिवसांत द्विधा अवस्था निर्माण होईल. त्यामुळे निर्णय घेणे अवघड होईल आणि या दिवसांत कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. बाकी दिवसांचा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल आहे. पण याही वेळी अनोळखी व्यक्तीपासून चार हात लांब राहा. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क रास (Cancer Horoscope)

कामाच्या ठिकाणी अडचणी वाढू शकतात अशी चिन्हे आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीबदलाचा विचार करत असाल तर शोध मोहिमेचा वेग वाढवावा लागेल. ५, ६ आणि ७ असे तीन दिवस संघर्षदायक वातावरण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. संतती सौख्य लाभेल. दुखणे अंगावर काढू नका. महिलांनी अतिविचार करणे टाळावे व कृतीवर भर द्यावा.

सिंह रास (Leo Horoscope)

कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला डाग लागण्याची सुद्धा शक्यता दिसत आहे. पण तुम्ही प्रामाणिकपणा सोडू नका. मानसिक स्थैर्य असल्यास तुम्ही आठवड्याच्या शेवटाकडे पुन्हा तुमचा मान- सन्मान पुन्हा मिळवू शकणार आहात. खाण्या-पिण्याच्या सवयी शरीराला नुकसान पोहोचवत नाहीत याची खात्री करा. घरगुती वातावरणात चांगले बदल होतील. शेवटाकडे मानसिक समाधान लाभेल.

कन्या रास (Virgo Horoscope)

एक घाव दोन तुकडे करू नका. कोणी काय करावे कोणी कसे वागावे या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. व्यवसायात यशप्राप्ती होणार आहे. तुमच्या मेहनतीला नशिबाची मजबूत साथ मिळू शकते. तुमच्या आई- वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिकदृष्टय़ा ताणतणाव घेऊ नका. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या मंडळींचे प्रतिष्ठित लोकांशी संपर्क वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीचा योग आहे. ३, ४ हे दोन दिवस शांत राहून काम करा. महत्त्वाचे काम करताना सतर्कता बाळगा. अंदाज घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नका. अन्यथा फसगत होऊ शकते. नोकरदार वर्गाला कामामध्ये जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिकबाबतीत व्यवहार जपून करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे.सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी काळजीपूर्वक हाताळावा लागेल. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवावा लागेल. नोकरदार वर्गाने कोणाच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करावे लागतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वाणी व उत्साह नियंत्रणात राहील याची खात्री करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

कामामधील उतार- चढाव तुम्हाला मानसिक दृष्टीने थकवू शकतात पण अशावेळी योगसाधना महत्त्वाचा हातभार लावेल. तुम्हाला प्रवासाचे योग आहेत. महिलांनाही आपली बाजू सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. तुम्ही नियमित आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं करूनच तुमची ओळख बनवू शकता आणि हा बदल करण्यासाठी हा आठवडा लाभदायक आहे. मात्र व्यावसायिकदृष्टय़ा व्यवहार करताना हुशारीने वागा. नोकरदार वर्गाला वेळेचे बंधन पाळावे लागेल. वायफळ खर्च टाळा.

मकर रास (Capricorn Horoscope)

आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आळस झटकून कामाला लागा. व्यवसायात पर्यायी मार्ग काढा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या काही गोष्टी नाही पटल्या तरी त्या पटवून घ्याव्याच लागतील. संतती सौख्य लाभेल. तुम्हाला वस्तूंची व पैशांची विशेष काळजी घ्यावी लागेल. सुरक्षेवर भर द्या.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या कामाच्या कक्षा रुंदावण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्यावरील कामाचा भार वाढू शकतो पण तितकीच तुमची ओळख व मान- सन्मान सुद्धा दुप्पटीने वाढू शकणार आहे. नोकरदार वर्गाला कामाचा आढावा घेताना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. घरगुती वातावरण आनंदी राहील. मानसिक समाधान लाभेल.

हे ही वाचा<< ३१ ऑक्टोबरपर्यंत ३ ग्रहांचे गोचर, ४ चार राजयोग; नवरात्र व पितृपक्षात तुमचं नशीब बदलणार? १२ राशींचं मासिक भविष्य

मीन रास (Pisces Horoscope)

उद्योगधंद्यातील तांत्रिक अडचणी कमी होऊ लागतील. व्यवसायात यशस्वी वाटचाल राहील. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात नेतृत्व हाती येईल. शेजाऱ्यांची मदत मिळेल. कुटुंबातील राग रुसवे दूर होतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader