Budh- Shukra- Rahu Yuti Trigrahi Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा त्याचा प्रभाव समस्त मानवी जीवनावर दिसून येऊ शकतो. अनेकदा ग्रह एकाच वेळी एकाच राशीत प्रवेश घेत असल्याने यातून अनेक शुभ- अशुभ योग साकारले जातात. मार्च महिन्याच्या सरतेशेवटी आता ३१ मार्चला बुध- राहू- शुक्र हे तीन ग्रह मेष राशीत एकत्र येऊन पहिल्यांदाच त्रिगही योग साकारणार आहेत. २७ मार्चला बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे जिथे शुक्र अगोदरच स्थित आहेत. तसेच ३१ मार्चपासून राहुचा प्रभावही मेष राशीत सुरु होईल यामुळे त्रिगही योगाची निर्मिती होत आहे. या राजयोगाने काही राशींचे भाग्य उजळण्याची चिन्हे आहेत. या राशी कोणत्या व त्यांना नेमका काय लाभ होऊ शकते हे पाहूया…

३१ मार्चपासून ‘या’ राशी होणार श्रीमंत

मेष रास (Aries Zodiac)

मेष राशीसाठी बुध- शुक्र- राहू युती शुभ सिद्ध होणार आहे. येत्या काळात मेष राशीच्या लग्न स्थानी त्रिगही योग तयात होत आहे. यामुळे आपल्याला व्यक्तिमत्वात विशेष सकारात्मक बदल आढळून येऊ शकतात. आपल्याला समाजात मानाचे स्थान लाभू शकते. इतकेच नाही तर आर्थिक बाजू सुद्धा सबळ होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला या काळात आपले लक्ष्य ओळखण्याची गरज आहे व त्यासाठी पूर्णपणे मेहनत घ्यावी लागेल. तुमचा लाभ असा की तुमच्या प्रत्येक निर्णयात नशीब साथ देऊ शकते. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीचे सहकार्य लाभू शकते. याकाळात तुमच्या माध्यमातून इतरांचे हे नशीब फळफळण्याची शक्यता आहे.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार

सिंह रास (Leo Zodiac)

ज्योतिष शास्त्रानुसार त्रिगही राजयोग सिंह राशीच्या मंडळींसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. हा राजयोग आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत भाग्य स्थानी तयार होत आहे. यामुळे आपल्याला नशिबाची साथ लाभू शकते. आपल्याला कामात मित्रांची मदत घ्यावी लागेल त्यामुळे तुमच्या जिभेवर गोडवा व डोक्यावर बर्फ ठेवून इतरांशी संवाद साधा. तुम्हाला समजूतदारीने अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करता येतील. येत्या काळात प्रवासाची संधी सुद्धा लाभू शकते.

हे ही वाचा<< गुढीपाडव्यानंतर शनी- मंगळाची मोठी उलाढाल! ज्योतिषतज्ज्ञ सांगतात, यंदा तुम्हाला कसा होऊ शकतो धनलाभ?

कर्क रास (Cancer Zodiac)

बुध- शुक्र- राहू यांच्या संगमाने कर्क राशीच्या मंडळींचे करिअरशी संबंधित अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीत कर्मस्थानी राजयोग तयार होत आहे यामुळे आपल्या कामातील अडथळे नक्कीच दूर होऊ शकतात. येत्या काळात आपल्याला कामाच्या ठिकाणी पदोन्नतीचा सुद्धा योग आहे. यामुळेच तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. येत्या काळात तुम्हाला वडिलांच्या माध्यमातून प्रचंड लाभ होऊ शकतो मात्र तुम्ही मिळालेले धन कुठे गुंतवता हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader