Budh Shukra Yog : ज्योतिषशास्त्रामध्ये बुध आणि शुक्र अत्यंत शुभ ग्रह मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध, बुद्धी, व्यवसाय आणि धनाचे कारक मानले जाते. जेव्हा शुक्र हे सौंदर्य, प्रेम, कला आणि भौतिक सुखाचे कारक मानले जाते. दोन्ही ग्रह अत्यंत शुभ मानले जाते. या दोन्ही ग्रहाचा योग, संयोग, युती व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि यश आणते.
वैदिक पंचागनुसार, १९ जानेवारी २०२५, रविवारला बुध आणि शुक्राला एकत्र घेऊन लाभ दृष्टी योग निर्माण केला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या योगमध्ये दोन्ही ग्रह एक दुसऱ्यांवर ६० डिग्रीवर असणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध शुक्र लाभ अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीच्या जीवनात धन, प्रेम आणि सुख सुविधांमध्ये वृद्धी दिसून येते. यामुळे हा योग निर्माण झाल्याने काही राशींना लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत.

मिथुन राशी (Mithun Rashi)

मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि शुक्र ग्रह मित्र आहे. अशात या योगमुळे मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. या लोकांना इनकमचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. व्यवसायात या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. कला , लिखान, मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठे यश मिळू शकते. लव्ह लाइफमध्ये गोडवा दिसून येईल. जे लोक विवाहाचा वाट पाहात आहे त्यांचे विवाहाचे योग जुळून येईल. आरोग्यामध्ये सुधारणा दिसून येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो.

21 January Rashi Bhavishya in Marathi
२१ जानेवारी पंचांग: आज मेष ते मीनवर कसा पडणार मंगळाचा प्रभाव? कोणावर संकट तर कोणाला नवीन संधी देऊन जाणार?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
people born on these dates are Best Wife
‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली असतात परफेक्ट लाइफ पार्टनर! सुख दु:खात नवऱ्याला देतात साथ, करतात आर्थिक सहकार्य
Mangal Gochar 2025 Mangal Pushya Yog 2025
Mangal Gochar 2025 : मंगळाच्या पुष्य नक्षत्रातील ५० वर्षांनंतरच्या प्रवेशामुळे ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; करिअर, व्यवसायात प्रगती अन् संपत्तीत प्रचंड वाढ
today horoscope shukra gochar 2025
१ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींचे लोक होणार कोट्यधीश! शुक्राच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेशाने मिळणार नोकरीत बढती अन् अपार संपत्ती
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

कन्या राशी (Kanya Rashi)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय फायद्याचा ठरू शकतो. या दरम्यान या लोकांच्या करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. व्यवसायात या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. अभ्यास आणि स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळू शकते. कुटुंबामध्ये सुख शांतीमध्ये लाभ मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांची आर्थिक वृद्धी होऊ शकते. लव्ह पार्टनरकडून सहकार्य मिळू शकते. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून नफा मिळू शकतो.

मीन राशी (Meen Rashi)

मीन राशीच्या लोकांसाठी अचानक धनलाभ मिळू शकतो. कला, संगीत आणि चित्रपटाशी संबंधित लोकांसाठी हा काळ फायद्याचा ठरू शकतो. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग जुळून येतील. विदेश यात्राचे योग सुद्धा जुळू शकतात. या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात प्रगती होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader