Budh Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. २९ नोव्हेंबरपासून बुध अस्त होणार आहे. जो जवळपास १३ दिवसांपर्यंत याच अवस्थेत राहील. त्यानंतर डिसेंबरमध्ये बुध वृश्चिक राशीमध्ये वक्री होईल. बुधाच्या वक्री होण्याने या काळात काही राशींच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तसेच त्यांच्या धन-संपत्तीत वाढ होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रहाला मानले जाते. पंचांगानुसार, बुध १२ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून १६ मिनिटांपासून उदय होणार आहे. ज्याच्या शुभ प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना हवे तसे यश मिळवता येईल.

star pravah mi honar superstar chhote ustaad season 3 show winner
मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३ : यवतमाळची गीत बागडे ठरली महाविजेती! मिळालं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान

बुध देणार प्रत्येक कामात यश

सिंह

बुध ग्रहाचा उदय सिंह राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ सिद्ध होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. बँक बॅलन्स वाढेल. करिअर आणि व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवनात सुखमय क्षण व्यतीत कराल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणच्या नव्या जबाबदाऱ्या पार पाडाल. नात्यामध्ये सुखाचे क्षण येतील.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा उदय खूप अनुकूल सिद्ध होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. कन्या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. कुटुंबात आनंदी आनंद होईल. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल.

हेही वाचा: पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश

तूळ

तूळ राशींच्या व्यक्तींनाही बुध ग्रहाचा उदय सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. समाजात मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. भाग्याची चांगली साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)