Budh uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. बुधदेखील इतर ग्रहांप्रमाणे त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. सध्या बुध वृश्चिक राशीत स्थित असून तो नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अस्त झाला आहे. तसेच तो १३ दिवसांपर्यंत अस्त राहिल. त्यानंतर पुन्हा बुध ग्रह उदित अवस्थेत येईल.
पंचांगानुसार, बुध १२ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी उदित होणार असून याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पडेल.
‘या’ तीन राशी होणार मालामाल
तूळ
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा उदय खूप लाभदायी सिद्ध होईल. या राशीमध्ये बुध दुसऱ्या भावात उदित होईल. या काळात आकस्मिक धनलाभ होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल, शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींसाठीदेखील बुध ग्रहाचा उदय अत्यंत अनुकूल असेल. या राशीत बुध चौथ्या घरात उदित होईल. या काळात आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आईबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. विद्यार्थ्यांना प्रत्येक कामात यश मिळेल.
हेही वाचा: शुक्र आणि राहू देणार बक्कळ पैसा; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार
वृश्चिक
वृश्चिक राशीत बुध आठव्या आणि अकराव्या घराचा स्वामी असून तो लग्न भावात विराजमान होईल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मात्र, प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. संपत्तीत वाढ होईल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)