Budh Uday 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी, संवाद आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. ग्रहांचा राजा बुध सध्या मेष राशीत भ्रमण करतोय, पण ८ एप्रिल २०२५ रोजी बुध मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करेल, ज्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येईल. बुध ८ एप्रिलमध्ये मीन राशीत असेल, त्यानंतर तो गुरुवारी १५ मे २०२५ रोजी अस्त होईल. काही राशींसाठी बुधाचा मीन राशीतील प्रवेश शुभ सिद्ध होऊ शकतो. या राशींच्या लोकांना करिअर आणि नातेसंबंधांमध्ये सुधारणेसह आर्थिक प्रगती साधता येईल. बुध ग्रहाच्या उदयानंतर कोणत्या राशींना चांगला काळ येईल हे जाणून घ्या.
बुधाचा मीन राशीतील प्रवेश ‘या’ राशींसाठी ठरेल फलदायी
वृषभ (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या लोकांसाठी मीन राशीतील बुधाचा उदय खूप शुभ ठरणार आहे, यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, कौटुंबिक संबंध सुधारतील. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता राहील. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल, नवीन काम सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे.
सिंह (Leo Zodiac)
बुध राशीचा उदय सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. प्रलंबित कामांमध्ये यश मिळेल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तुमच्या प्रियजनांबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. लव्ह लाइफसाठी पूर्वीपेक्षा चांगले दिवस येतील, कौटुंबिक जीवनात सुधारणा होईल.
कर्क (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचा मीन राशीतील उदय फायदेशीर ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यापारी काही नवीन काम सुरू करू शकतात. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, त्यामुळे अनेक आर्थिक समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल.