Budh Uday 2025: ग्रहांचा राजकुमार बुध हा नऊ ग्रहांमधील खूप खास ग्रह मानला जातो. बुध ग्रह बौद्धिक क्षमता, प्रगती, व्यवसाय, ज्ञान, शिक्षण, वादविवाद इत्यादींचा कारक मानला जातो; यामुळे बुध ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होत असतो. बुध ग्रहाचा २१ जानेवारी रोजी अस्त झाला. सलग ३३ दिवस स्थिर राहिल्यानंतर आता २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता बुधाचा कुंभ राशीत उदय होईल. कुंभ राशीत बुध राशीच्या उदयामुळे अनेक राशींना फायदा होईल, पण अशा तीन राशी आहेत, ज्यांना भरपूर फायदे मिळू शकतात.
बुध ग्रहाच्या उदयामुळे ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा अन् संपत्ती
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा उदय खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चांगले फायदे मिळू शकतात. विशेषत: नोकरदार वर्गाला खूप फायदे मिळू शकतात. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होऊ शकते. यासह पदोन्नती अन् पगार वाढण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांनाही यश मिळू शकते. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मोठी ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात. तुम्ही आनंदी जीवन जगू शकता.
कुंभ
कुंभ राशीतील बुधाचा उदय कुंभ राशीच्या लोकांना फलदायी ठरू शकतो. या काळात कुंभ राशीच्या लोकांची बौद्धिक क्षमता वाढू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याशी संबंधित मोठा निर्णय घेऊ शकता. आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो. आयुष्यात आदर आणि सन्मान वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. व्यवसायात लक्षणीय वाढ होऊ शकते. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात. नोकरदार वर्गाबरोबर व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही खूप फायदे मिळू शकतात.
सिंह
बुध ग्रहाचा उदय सिंह राशीच्या लोकांसाठीदेखील आनंद घेऊन येणारा ठरेल. या राशीच्या लोकांची निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्याबाबत मोठा निर्णय घेता येऊ शकतो. व्यवसायातही तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. सरकारी कामात यश मिळू शकते.