Budh Uday 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार तसेच बुद्धिमत्ता, व्यवसाय, शिक्षण, वादविवाद, एकाग्रता इत्यादींचा कारक मानले जाते. त्यामुळे बुध ग्रहाच्या राशी बदलाने १२ राशींच्या जीवनात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतात. यावेळी बुध मीन राशीत आहे. पण मे महिन्यात बुधाचा अस्त होईल तो जून महिन्यात मिथुन राशीत उदय करेल. मिथुन राशीत बुधाच्या उदयाने काही राशींच्या जीवनात सुख, आनंद येऊ शकतो. श्रीमंत होण्याच्या अनेक संधी येतील, पण नेमका कोणत्या राशींना याचा फायदा होईल जाणून घेऊ…

वैदिक पंचागानुसार, बुध १७ मे रोजी मेष राशीत अस्त होईल आणि सुमारे २३ दिवस अस्त राहिल्यानंतर ८ जून रोजी संध्याकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी बुध मिथुन राशीत उदय करेल. बुधाच्या या राशी बदलाने काही राशींना भरपूर फायदा होईल, प्रत्येक कामात त्यांना यश मिळू शकेल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचा मिथुन राशीतील उदय फलदायी ठरु शकतो. या काळात बऱ्याच दिवसांपासून थांबलेल काम पुन्हा सुरू होऊ शकते. तसेच बुध ग्रहामुळे तुम्ही भरपूर पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते तसेच पगारवाढही मिळू शकते. तुमचे नेतृत्व कौशल्य वाढेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. हा काळ व्यावसायिकांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात गुंतवणूक करून तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो.

मिथुन

मिथुन राशीतील बुधाचा उदय त्याच राशींच्या जीवनात आनंद घेऊ येऊ शकतो. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात भरपूर फायदे मिळू शकतात. मुलांबाबत काही आनंदाच्या गोष्टी घडू शकतात. मुलांकडून बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तुम्हाकडे नोकरी आणि व्यवसायात अनेक सुवर्ण संधी चालून येऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. यासह आर्थिक परिस्थिती चांगली राहील आणि तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे नातेही अधिक घट्ट होऊ शकते.

तुळ

तुळ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा उदय फायदेशीर ठरू शकतो. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. तुम्ही करत असलेल्या कामात तुम्हाला मोठे यश मिळू शकेल. याच्या मदतीने तुम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी तयार राहू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्याही संपू शकतात. तुमच्या मुलांकडूनही तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. शिक्षण क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे.