Budh uday: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. सध्या बुध मिथुन राशीत असून, २७ जून रोजी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. बुध ग्रहाचा उदय होताच १२ राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ किंवा अशुभ परिणाम पाहायला मिळतो. तसेच २९ जून रोजी बुध कर्क राशीत प्रवेश करील. याचादेखील शुभ परिणाम काही राशींच्या लोकांवर पाहायला मिळेल. या व्यक्तींना धन-संपत्ती, नोकरी, मान-सन्मान प्राप्त होईल.

मिथुन

बुध हा मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा उदय लाभदायक मानला जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचा उदय शुभ परिणामकारक ठरेल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील.

हेही वाचा: तब्बल ५ वर्षानंतर कर्क राशीत सूर्य-शुक्र करणार प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या लोकांना होणार अचानक धनलाभ

तूळ

बुध ग्रहाचा उदय होण्याने तूळ राशीच्या व्यक्तींनाही त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)