Budh Uday 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर, राशी परिवर्तन व नक्षत्र बदल करत असतो. यानुसार राशीचक्रातील प्रत्येक राशीवर शुभ- अशुभ प्रभाव दिसून येऊ शकतो. आजच्या चंद्रग्रहणानंतर सुद्धा यंदाच्या ग्रहमालेतील राजापदी असणारे बुध देव हे उदित होणार आहेत. मेष राशीत प्रवेश घेऊन बुधाचा अस्त झाला होता हा काळ काही राशींसाठी प्रचंड कष्टाचा ठरत होता पण आता, बुध देवाच्या उदयाने या राशींच्या भाग्याचे दार उघडण्याची शक्यता आहे. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया..
बुध उदयासह आजपासून या राशींना प्रचंड धनलाभाची संधी
मेष रास (Aries Zodiac)
बुध ग्रहाचा उदय तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या अकराव्या घरात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात आणि व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. दुसरीकडे, मेष राशीवर बुधाचे राज्य आहे आणि ज्योतिष शास्त्रात बुध हा व्यवसाय कारक ग्रह असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बुधाच्या उदयामुळे तुम्हाला व्यवसायात चांगले पैसे मिळू शकतात.
कर्क रास (Cancer Zodiac)
तुमच्या कुंडलीतील दशम भावात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. या स्थानाला कर्म आणि करिअरचे स्थान म्हणतात. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. यासोबतच या काळात तुमची प्रमोशन होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. परदेशातून आर्थिक लाभ होऊ शकतात. यावेळी तुमची कार्यशैली देखील सुधारेल, तसेच तुमच्या कामाचं ऑफिसमध्ये कौतुक होईल.
हे ही वाचा<< १३० वर्षांनी चंद्र ग्रहणाला दुर्मिळ योग! १२ राशींपैकी कोणाला सुखाचे चांदणे? तुमच्या राशीला धन की कष्ट, वाचा
सिंह रास (Leo Zodiac)
बुध तुमच्या राशीत दुसऱ्या स्थानात असणार आहे. या स्थानाला धन आणि वाणीचे घर म्हणतात. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, तुमचे पैसे अडकले असतील तर ते या काळात मिळू शकतात. ज्या लोकांची कारकीर्द भाषणाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, वकील, मार्केटिंग शिक्षक, त्यांच्यासाठी हा काळ उत्कृष्ट ठरू शकतो. दुसरीकडे, सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात चांगले यश मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)