Budh Uday In Meen 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक काळानंतर काही ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रहांचा उदय आणि अस्त होतो. यापैकी एक ग्रह म्हणजे बुध. बुध ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. ग्रहांचा राजकुमार बुध उदयाला येणार आहे. बुध धन आणि संपत्ती यांचाही स्वामी मानला जातो. मार्च महिन्यात बुध उदयास येणार आहे. बुधाचा उदय काही राशींसाठी निश्चितच आनंदाची बातमी आणणारा ठरु शकतो. ८ फेब्रुवारीला बुध मकर राशीत अस्त झाला असून तर १५ मार्चला मीन राशीत ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे. ७ मार्चला बुधदेव सकाळी ९ वाजून २१ मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींना येत्या दिवसात जीवनात शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. बुधदेव काही राशींना शुभ फळ देऊ शकतात. जाणून घेऊयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना मिळणार पैसा?
वृषभ राशी
बुधाचा उदय वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाकडून तुम्हाला पैसे मिळू शकतात. व्यवसायात बदलांसह वाढ देखील होऊ शकते. कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. चांगल्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. या दिवसात या राशीच्या लोकांना चांगली कमाई करण्याची संधी मिळू शकते. तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : Chanakya Niti: नवरा-बायकोमधील ‘या’ ३ कारणांमुळे वाढतो दूरावा; सुखी वैवाहिक जीवनासाठी ‘ही’ सूत्रं नोट करा )
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय शुभ ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रतिकूल दिवस येऊ लागतील. नोकरी आणि व्यवसायात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊन आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नवीन योजनांवर काम करणे फायदेशीर ठरु शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकतो.
कर्क राशी
बुधाचा उदय कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. जमीन व मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून फायदा मिळू शकतो. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकतं. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)