Budhaditya Raj Yog In Kundli: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा कोणता ग्रह राशी परिवर्तन करतो किंवा इतर कोणत्याही ग्रहाशी युती करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. १० सप्टेंबर रोजी बुध ग्रह कन्या राशीत वक्री झाला आहे. त्याचबरोबर कन्या राशीतच बुधादित्य योग तयार होत आहे.

बुधाच्या वक्री होण्यामुळे शक्तिशाली बुद्धादित्य योग तयार होत आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांना या काळात चांगले पैसे आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या ३ राशी…

आणखी वाचा : Chanakya Niti: ज्यांच्या पत्नीमध्ये हे ४ गुण असतात, असे पुरुष भाग्यवान असतात

धनु: बुधादित्य राजयोग तयार झाल्याने तुमचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण तुमच्या राशीपासून दशम भावात बुधादित्य योग तयार होईल. जे कार्यक्षेत्र आणि नोकरीचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला नवीन नोकरीचा प्रस्ताव मिळू शकतो. तसंच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात नवीन ऑर्डर आल्याने चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. दुसरीकडे नवीन व्यावसायिक संबंध तयार करून व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. यावेळी राजकारणात यश मिळवता येईल. तुम्ही पुष्कराज घालू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आणखी वाचा : Dussehra 2022 : यावर्षी दसरा ४ की ५ ऑक्टोबरला? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

वृश्चिक : बुध वक्री होत असल्यामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या गोचर कुंडलीत ११ व्या स्थानात बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांमधून पैसे मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करून चांगले पैसे कमवू शकाल. मालमत्ता आणि वाहने देखील खरेदी करू शकता. तसंच जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल, तर तुम्ही यावेळी चांगला नफा कमवू शकता. जर तुम्ही एनजीओ किंवा राजकारणाच्या माध्यमातून क्षेत्राशी संबंधित असाल तर या काळात तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तुम्ही नीलमणी रत्न घालू शकता, जो तुमच्यासाठी लकी स्टोन ठरू शकतो.

आणखी वाचा : बुधादित्य राजयोगमुळे या ३ राशींचे भाग्य उजळू शकतं, सूर्य आणि बुधाची असेल विशेष कृपा

सिंह: बुध ग्रहाच्या वक्री प्रभावामुळे तुमच्या गोचर कुंडलीत द्वितीय स्थानात शक्तिशाली बुधादित्य राजयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रात ज्याला पैसा आणि वाणीचे घर मानले जाते. यावेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उधार दिलेले पैसे परत मिळतील. दुसरीकडे जर तुम्हाला शेअर बाजार आणि सट्टा, लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करू शकता. फायदा होऊ शकतो.

तसंच जर तुमचे कार्य क्षेत्र भाषणाशी संबंधित असेल (शिक्षक, मार्केटिंग, संगीत), तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो किंवा तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य देव आहे आणि ही युती सूर्य-बुध यांच्या प्रभावामुळे तयार होत आहे. त्यामुळे हा योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.