Budh Vakri 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करताना दिसतो. ग्रह वेळोवेळी त्यांची चाल बदलताना दिसतात. बुध हा ग्रहांचा राजकुमार आहे जो दर महिन्याला त्याच्या चालीमध्ये बदल करताना दिसतो. ४ ऑगस्ट रोजी बुध ग्रह सूर्याच्या सिंह राशीमध्ये अस्त होणार आहे. तसेच ५ ऑगस्ट रोजी बुध वक्री चालीत कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आणि उलट चाल सुरू करणार. बुध ग्रहाच्या उलट चालीचा मेष पासून मीनपर्यंत सर्वच राशींवर प्रभाव दिसून येईल. बुध वक्रीचा कोणत्या राशींना फायदा दिसून येईल, जाणून घेऊ या. (Budh Vakri 2024 budh transit in kark rashi for 24 days)

धनु राशी (Sagittarius Horoscope)

बुध ग्रहाची उलट चाल धनु राशीच्या लोकांना फायदेशीर ठरू शकते. या लोकांची कमाई वाढण्याची शक्यता आहे. तसेच या लोकांनी कल्पना केली नसेल अशा गोष्टींपासून त्यांना पैसा मिळू शकतो. या लोकांचे त्यांच्या जोडीदाराबरोबर प्रेम संबंध दृढ होतील. तसेच करिअरमध्ये चांगली स्थिती दिसून येईल. मनाप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील.

shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
Rahu Mangal Gochar 2025
Rahu Mangal Gochar 2025 : १०० वर्षानंतर राहु आणि मंगळ बदलणार चाल, ‘या’ तीन राशी होणार मालामाल, मिळणार पैसाच पैसा!
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा
Shatgrahi Yog in meen 2025
आता नुसता पैसा; मार्चपासून मीन राशीत निर्माण होणार तब्बल सहा ग्रहांची युती, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस

हेही वाचा : श्रावणी सोमवार, ५ ऑगस्ट पंचांग: व्यापारात होईल लाभ, नशिबाची मिळेल साथ; १२ पैकी ‘या’ राशींवर राहील महादेवाची कृपा; वाचा तुमचे राशीभविष्य

सिंह राशी (Leo Horoscope)

बुध ग्रह वक्री चालीमध्ये कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे. याचा फायदा सिंह राशीच्या लोकांना दिसून येईल. व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. व्यवसायात या लोकांना भरघोस नफा मिळू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. या लोकांच्या घर कुटुंबात शांतीचे वातावरण दिसून येईल. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन.

हेही वाचा : ११ ऑगस्टपासून सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? ‘धनाचा दाता’ देऊ शकतो लखपती बनण्याची संधी

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे वक्री चालमध्ये गोचर करणे शुभ ठरणार आहे. जीवनात सुरू असणार्‍या अडचणी कमी होतील. मुलांकडून शुभ वार्ता मिळू शकते. या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन त्याच बरोबर कर्क राशीची आर्थिक स्थिती अधिक चांगली दिसून येईल. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. नातेसंबंध आणि कुटुंबात गोडवा दिसून येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader