Budh Vakri In Mesh: नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला एक महिना लागतो. नवग्रहांमध्ये बुधाचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बुध हा बुद्धिमत्ता, शिक्षण, ज्ञान, बुद्धी, वाणी, प्रतिभा इत्यादींचा कारक ग्रह आहे. बुध ग्रहाच्या कृपेनं एखाद्या व्यक्तीमध्ये अनेक उत्कृष्ट कौशल्ये निर्माण होतात. त्यामुळे व्यक्तीला जीवनाच्या अनेक क्षेत्रात यश मिळविण्यात मदत होते, असे मानतात. येत्या २ एप्रिल २०२४ रोजी व्यवसाय आणि उद्योगासाठी जबाबदार असलेला बुध ग्रह मेष राशीत वक्री होणार आहे. बुधदेवाच्या वक्री स्थितीने काही लोकांची करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या नशीबवान राशी कोणत्या आहेत…

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

सिंह राशी

या राशीच्या नवव्या भावात बुधदेव वक्री होणार आहेत. अशा स्थितीत सिंह राशीच्या लोकांना धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे.  व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. दीर्घकाळ प्रलंबित कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : होलाष्टकात होणार शनिदेवाचा उदय! १८ दिवसांनी ‘या’ राशींना होणार धनलाभ? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी )

धनु राशी

या राशीच्या सातव्या भावात बुधदेव वक्री होणार आहेत. अशा स्थितीत धनु राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे आगमन होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. प्रलंबित पैसे मिळू शकतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे होऊ शकतात. जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या पाचव्या भावात बुधदेव वक्री होणार आहेत. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या बेरोजगार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या काळात नोकरी करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्यांच्या कमाईत वाढ होऊ शकते. खिसा सतत पैशाने भरलेला राहू शकतो. एवढंच काय तर या राशीच्या लोकांचा अडकलेला पैसाही परत मिळू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader