Budh Vakri 2024: नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला एक महिना लागतो. नवग्रहांमध्ये बुधाचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बुध हा बुद्धिमत्ता, शिक्षण, ज्ञान, बुद्धी, वाणी, प्रतिभा इत्यादींचा कारक ग्रह आहे. आता बुधदेव ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९:४४ मिनिटांनी सिंह राशीमध्ये वक्री होणार आहेत. बुधदेव एकूण २४ दिवस वक्री चाल चालणार आहेत. बुधदेवाचे सिंह राशीमध्ये वक्री होणे काही राशींसाठी लाभदायी ठरु शकते. त्यांना आयुष्यात अपार यश, धन मिळण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी….

‘या’ राशींच्या लोकाचं भाग्य उजळणार, आर्थिक अडचणी होतील दूर?

मिथुन राशी (Mithun Zodiac)

बुधाच्या प्रतिगामी हालचालीचा अर्थात वक्री चालीचा मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ परिणाम होण्याची शक्यता आहे. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो. नवीन संधीही मिळू शकतात. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
Malavya Rajyog
शुक्र निर्माण करणार मालव्य राजयोग! २०२५ मध्ये ‘या’ राशींचे नशीब पलटणार, करिअरमध्ये यशासह मिळणार अपार धन
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

(हे ही वाचा : १८ दिवसांनी ग्रह राजा करणार मोठी उलाढाल; ‘या’ राशी होणार मालामाल? सूर्यदेव गोचर अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती)

तूळ राशी (Tula Zodiac)

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध वक्री झाल्याने या राशीच्या व्यक्तींना त्याचा विशेष प्रभाव जाणवेल. तूळ राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे आगमन होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. प्रलंबित पैसे मिळू शकतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे होऊ शकतात. या राशीच्या बेरोजगार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळू शकतो. उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. 

धनु राशी (Dhanu Zodiac)

बुधाची वक्री चाल या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरेल. धनु राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला बढती आणि पगारवाढीची भेट मिळू शकते. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी काळ फलदायी ठरु शकते. प्रवासातून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. या राशीतील लोकांना मनासारखा जोडीदार लवकरच मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण असू शकते. या राशीच्या बेरोजगार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)