Mercury Retrograde in Leo: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो. या ग्रहांचा सर्व बारा राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला व्यापार, बुद्धिमत्ता, तर्क, अर्थव्यवस्था, वाणी आणि संवादाचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. ग्रहांचा राजकुमार अशी ओळख असलेला बुध ग्रह ५ ऑगस्टला सकाळी १०.२६ वाजता सिंह राशीत वक्री होणार आहेत. बुधदेवाच्या या स्थितीमुळे काही राशींना व्यापारात मोठा धनलाभ, करिअरमध्ये यश आणि जीवनात सुख लाभण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

‘या’ राशींचे चमकणार भाग्य?

मेष राशी (Mesh Zodiac)

बुध ग्रहाच्या वक्री चालीचा मेष राशींच्या लोकांना फायदा होऊ शकतो. या काळात मेष राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. नोकरदार लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. यासोबतच कर्जबाजारी लोकांना कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. तर व्यायवसायिकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. आर्थिक मिळकत वाढवण्याच्या अधिकाधिक संधी मिळू शकतात. धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : गुरुपौर्णिमेला ४ दुर्मिळ योग जुळून आल्याने ‘या’ राशींच्या नशीबाचं टाळं उघडणार, उत्पन्नात होणार प्रचंड वाढ? कुणाचे बदलतील दिवस? )

कर्क राशी (Kark Zodiac)

बुध ग्रहाची वक्री चाली कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडू शकतात. कार्यक्षेत्रात मान-सम्मान मिळून आपली प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळू शकतो. उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण असू शकते.

कुंभ राशी (Kumbha Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांनासुद्धा बुध वक्रीचा प्रचंड लाभ मिळू शकतो. तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. या राशीच्या विद्यार्थ्यांना बुध गोचरचा लाभ मिळू शकतो. बेरोजगार असणाऱ्या लोकांचे या दरम्यान भाग्य खुलू शकते. या काळात आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. बरेच दिवस रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. नात्यात गोडवा राहण्याची शक्यता आहे.  कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)