Budh Gochar: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा यंदाच्या नववर्षातील ग्रहांचा राजा असणार आहे. बुध हा प्रेम, वैभव, बुद्धी व प्रगतीचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात बुध गोचराला विशेष महत्त्व आहे. आज म्हणजेच २१ एप्रिलला बुध ग्रह मेष राशीत प्रवेश घेणार आहेत. उद्या अक्षय्य तृतीयेपर्यंत बुध ग्रहाचे मेष राशीतील मार्गीक्रमण पूर्ण होऊन यातून पंचग्रही राजयोग तयार होणार आहे. बुध मेष राशीत येताच त्याचा काही राशींमधील प्रभाव कमी- अधिक होऊ शकतो या काळात चार अशा राशी आहेत ज्यांना प्रचंड लाभाचे योग तयार होत आहेत. या राशी कोणत्या व त्यांचं भाग्यात कोणत्या मार्गाने बुध ग्रहाची कूर्पा दिसून येणार आहे हे पाहूया…
आजपासून ‘या’ राशींच्या भाग्यात प्रचंड श्रीमंती?
मेष रास (Mesh Rashi)
तुमच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन मिळू शकते. स्वतःवर दृढ विश्वास ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य निणय घेता येऊ शकतात. तुमचे निर्णयच तुमच्या भाग्यात मोठी झळाळी आणू शकतात. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढू शकते. कुटुंबाची साथ लाभल्याने मानसिक शांती अनुभवता येऊ शकते. धनलाभ झाल्याने आर्थिक चणचण कमी होऊ शकते.
मिथुन रास (Mithun Rashi)
नोकरीमध्ये पदोन्नतीसह पगारवाढीचा योग आहेत पण तुमच्या कुंडलीत कुटुंबापासून लांब राहावे लागण्याची चिन्हे आहेत. कामाच्या निमित्ताने दुसर्या शहरात वास्तव्यास जावे लागू शकते. नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी शुभ मुहूर्त आहेत. मुख्य म्हणजे मित्रांच्या मदतीने तुमच्या भाग्यात धनलाभ लिहिलेला आहे. तुम्हाला विश्वास ठेवताना गोष्टींची पारख नीट करून घ्यायला हवी.
सिंह रास (Sinha Rashi)
तुमच्या वाणीमध्ये माधुर्य आणण्याची खूप गरज आहे. त्यामुळेच तुमची बहुतांश कामे मार्गी लागू शकतात. आई वडिलांच्या सहकार्याने तुम्ही आयुष्याला कलाटणी देणारी स्थिती अनुभवू शकता. आर्थिक बाजूने तुमचे दिवस सुखकर होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. अभ्यासपूर्ण निर्णय घ्या. विनाकारण वादात अडकू नका.
हे ही वाचा<< उद्या अक्षय्य तृतीयेला गुरुदेवांचे सर्वात मोठे गोचर; ‘या’ ५ राशींना देणार सोन्याचे सुख, बक्कळ धनलाभ व गडगंज श्रीमंती?
मीन रास (Meen Rashi)
मीन राशीच्या गोचर कुंडलीत बुध ग्रह हा दुसऱ्या व चौथ्या स्थानी भ्रमण करणार आहे. हे कर्माचे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला जिद्द व चिकाटीने काही कामे करावी लागू शकतात. ही कामे वेळच्या वेळी केल्यास तुमच्या यशाच्या मार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होऊ शकते. लग्न भावी सुद्धा गुरुदेव सक्रिय असल्याने वैवाहिक जीवनात आनंद अनुभवता येऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)