Maha Vipreet Rajyog 2023: बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणतात. हा ग्रह संपूर्ण सूर्यमालेतील सर्वात लहान मानला जातो आणि त्याच वेळी तो सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रहदेखील मानला जातो. बुध ग्रह ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचा आहे कारण हा ग्रह बुद्धिमत्ता, संवाद, वाणी आणि तर्कशक्तीचा कारक मानला जातो. सर्वात बुद्धिमान आणि जिज्ञासू अशा या ग्रहाचे संक्रमण होतं तेव्हा तो काही राशींसाठी राजयोग घेऊन येतो. सध्या बुध २४ ऑगस्ट २०२३ पासून वक्री अवस्थेत आहे. या स्थितीमुळे ‘विपरित राजयोग’ तयार झाला आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. हा राजयोग काही राशींसाठी फायदेशीर ठरु शकतो. त्यांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतो. पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना होऊ शकतो धनलाभ
मिथुन
मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि बुध देवाचे वक्री होणे या राशीच्या लोकांना खूप लाभ देऊ शकते. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. पैशाचे स्रोत वाढू शकतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. दुसरीकडे, सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या काळात चांगली बातमी मिळू शकते.
(हे ही वाचा : दोन महिन्यानंतर शनीदेव मार्गी होताच ‘या’ राशींना देणार अपार धन? माता लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकता कोट्याधीश )
कन्या
विपरित राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. करिअरमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या व्यावसायिक जीवनात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांना भरपूर पैसा मिळू शकतो.
मकर
विपरित राजयोग मकर राशीच्या लोकांना चांगले परिणाम देऊ शकतो . भाग्याची या लोकांना साथ लाभू शकते. या काळात उत्तम संधी मिळू शकतात. तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. तुम्ही नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)