Budha and Surya Rashi Parivartan 2024: ज्योतिषशास्त्रानुसार काही ठरावीक काळानंतर प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन होते. या राशी परिवर्तनामुळे अनेकदा त्यांची इतर ग्रहांसोबत युती निर्माण होते; ज्यामुळे शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. या शुभ योग आणि राजयोगाचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोगाला खूप खास मानले जाते. येत्या १६ सप्टेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत विराजमान होणार असून २३ सप्टेंबर रोजी कन्या राशीत बुध ग्रह प्रवेश करेल. त्यामुळे कन्या राशीत ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण होईल. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल.

‘बुधादित्य राजयोग’ देणार भरपूर (Budha and Surya Rashi Parivartan 2024)

सिंह

कन्या राशीत निर्माण होणारी बुध आणि सूर्याची युती या व्यक्तींसाठी खूप शुभ फळ देईल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. या काळात अनेकदा आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्ये होतील. मार्केटिंग, मीडिया, बँक व शिक्षण या क्षेत्रांतील व्यक्तींना यश मिळेल. तुमच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल.

वृश्चिक

बुधादित्य योग वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम सिद्ध होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. कुटुंबातील वाद मिटतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. तीर्थक्षेत्राला भेट द्याल. आर्थिक चणचण दूर होईल; तसेच वायफळ खर्च थांबतील. मुलांसोबत सहलीला जाल.

हेही वाचा: बुध-शुक्र देणार बक्कळ पैसा; युतीच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

मकर

कन्या राशीतील राशीच्या व्यक्तींसाठीही बुधादित्य योग भाग्यकारक ठरेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात धार्मिक कार्यात मन रमेल. तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)