Budha Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध देव २७ एप्रिल २०२५ रोजी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे, या नक्षत्राचा स्वामी ग्रह गुरु आहे. वैदिक शास्त्रात गुरुला ज्ञान, भाग्य, संतती, धर्म, विवाह आणि संपत्तीचा दाता मानले जाते, त्यामुळे बुधाचा नक्षत्र किंवा राशी बदलाने प्रत्येक राशींच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो. अशात बुधाचा गुरुच्या नक्षत्रातील प्रवेश काही राशींच्या जीवनात आनंद, सुख घेऊन येणारा ठरू शकतो. या राशींच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. पण, नेमक्या कोणत्या राशींसाठी हा बदल फलदायी ठरू शकतो जाणून घेऊ…

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी बुधाचा नक्षत्र बदल शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच या राशीच्या लोकांना समाजात चांगला आदर, मानसन्मान मिळू शकतो. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या मित्र किंवा कुटुंबासह कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन आखू शकता. कला, आरोग्य आणि माध्यम क्षेत्राशी संबंधित लोकांच्या कार्याला समाजात मान्यता मिळेल. यावेळी तुमच्या इच्छा पूर्ण होतील. नियोजित प्लॅन यशस्वी होण्यास मदत होईल.

वृषभ (Taurus)

बुधाचा रेवती नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. यावेळी तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती साधता येऊ शकते. नोकरदार आणि व्यावसायिकांच्या पदरी नव्या संधी येऊ शकतात. त्यांना अनेक नवीन स्रोतांकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळू शकते, ज्यामुळे तुमची खूप प्रशंसा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल, वरिष्ठांना तुमची मेहनत दिसून येईल. नोकरी आणि व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवासाची संधी मिळेल, जी तुमच्यासाठी शुभ ठरू शकते.

कर्क (Cancer)

बुध ग्रहाचा नक्षत्र बदल कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या रोजच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. तसेच वैवाहिक जीवनातील रुसवे-फुगवे, दुरावा संपेल आणि जवळीकता वाढेल. अविवाहित लोकांना चांगला जोडीदार मिळू शकेल. या काळात तुम्हाला अनेक मार्गाने पैसे कमावण्यात यश मिळू शकेल. तसेच व्यावसायिकांना मोठे प्रोजेक्ट मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यात फायदा होऊ शकतो. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तरुणांना त्यांच्या कारकिर्दीत फायदा होऊ शकतो.