Budhaditya Rajyog: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. नवग्रहामध्ये ग्रहांचा राजकुमार मानल्या जाणारा बुध ग्रहाने २९ ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केला असून १७ नोव्हेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्यदेखील या राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे वृश्चिक राशीमध्ये सूर्य आणि बुधाची युती निर्माण होईल. या युतीमुळे‘बुधादित्य योग’ निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोगाला खूप खास मानले जाते. या युतीमुळे काही राशीच्या व्यक्तींना फायदा होईल. त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती येईल.

बुधादित्य राजयोग तीन राशींना करणार मालामाल

तूळ

वृश्चिक राशीत निर्माण होणाऱ्या बुधादित्य राजयोगाच्या प्रभावाने तूळ राशीच्या खूप फायदा होईल. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. या राशीच्या व्यक्तींसाठीही बुधादित्य योग उत्तम सिद्ध होईल. आर्थिक चणचण दूर होईल; मुलांसोबत सहलीला जाल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. तुम्ही आनंदी राहिल्यामुळे प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. कुटुंबातील वाद मिटतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. तीर्थक्षेत्राला भेट द्याल.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींनाही वृश्चिक राशीत निर्माण होणाऱ्या बुधादित्य राजयोगाच्या प्रभावाने अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.

हेही वाचा: दिवाळीनंतर ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार धनसंपत्तीचे सुख

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींनाही वृश्चिक राशीतील बुधादित्य राजयोगाच्या प्रभावाने आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्ये होतील. मार्केटिंग, मीडिया, बँक व शिक्षण या क्षेत्रांतील व्यक्तींना यश मिळेल. या काळात आरोग्य उत्तम राहील. तुम्ही सकारात्मक विचार कराल. नवीन गोष्टींची सुरूवात करण्याच चांगली संधी आहे. गुंतणूक करणेही फायदेशीर ठरेल. समाजात मान-सन्मान वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)